Gold Rate Today: खुशखबर! होळीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा ३००० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Gold Rate Today Price Drop: सोन्याचे दर आज होळीच्या दिवशी घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे जवळपास ३२०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर घसरले

होळीच्याच दिवशी प्रति तोळ्यामागे ३००० रुपयांची घसरण

सोनं स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा

सोन्याचे दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर आज कमी झाले आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज होळीच्या दिवशी खुशखबर मिळाली आहे. त्यामुळेच तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ही सुवर्णसंधी आहे.

Gold Rate Today
Gold Rate: खरेदीदारांना दिलासा! आठवड्याभरानंतर सोन्याचे दर घसरले; वाचा १ तोळ्याचे भाव किती?

सणासुदीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेकजण आज होळीला सोनं खरेदी करतात. जर तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर आजचा मुहूर्तदेखील चांगला आहे त्याचसोबत सोन्याचे दर घसरले आहे. सोन्याचे दर १ तोळ्यामागे ३२९० रुपयांनी घसरले आहेत.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर ३२९० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर १,६९,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे २,६३२ रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर १,३५,८४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ३२,९०० रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

गुडरिटर्न्सनुसार, २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५५,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २,४०० रुपयांनी घसरुन १,२४,५२० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे ३०,००० रुपयांची घसरण झाली असून हे दर १५,५६,५०० रुपये झाले आहेत.

Gold Today
Gold Today

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,४६० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळ्यासाठी तुम्हाला १,२७,३५० रुपये मोजावे लागणार आहेत. १० तोळ्यामागे २४,६०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १२,७३,५०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,९६८ रुपयांनी घसरले असून १,०१,८८० रुपये झाले आहेत

Gold Rate Today
Gold Rate Today: युद्धामुळे दर गगणाला भिडणार! सोनं प्रति तोळा ₹९४३० ने वाढले, तर चांदीला २०,००० रुपयांची चकाकी, वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com