Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! प्रतितोळा ₹१७१००० वर पोहचले, आठवड्यात कधी स्वस्त, कधी महाग? वाचा सविस्तर

Gold Rate Today Price Hike: इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोन्याचे दर आज काही प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. काल हे दर खूप वाढले होते.
Published on
Summary

सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार

इराण इस्त्रायल युद्धामुळे काल सोनं महागलं

मागच्या आठवड्याभरातील सोन्याचे दर वाचा

संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अमेरिका-इराण दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सोन्याच्या दरात १२ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २३ हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली होती.

Gold Rate Today
Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोन्याचे दर १००० रुपयांनी कमी झाली झाली आहे. प्रत्यक्षात, दोन्ही धातुंचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मौल्यवान धातूंना प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले.

देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्येही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असतानाही सुरक्षित म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने दरात तेजी आली. मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्णच राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने जागतिक आर्थिक अनिश्चितता आहे.

Gold Rate Today
Gold, Silver Rate: बाजारातील चमक उडाली! सोन्यासह चांदीचे दर घसरले; चांदीच्या किमतीत ११,००० रुपयांची घसरण, जाणून घ्या आत्ताचे नवे दर

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १७१५०० रुपये आहेत. चांदीचेही दर २ लाख ९५ हजारांवर पोहचले आहेत.

सोन्या-चांदीचे आठवडाभरातील भाव (Gold Rate Weekly Update)

१८ फेब्रुवारी

सोने-१ लाख ५२ हजार ५००

चांदी-२ लाख ४३ हजार

१९ फेब्रुवारी

सोनं-१ लाख ५४ हजार ६००

चांदी-२ लाख ५० हजार

२० फेब्रुवारी

सोनं-१ लाख ५४ हजार ९००

चांदी- २ लाख ५० हजार

२१ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ५७ हजार

चांदी- २ लाख ६७ हजार

२३ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ५८ हजार

चांदी- २ लाख ७२ हजार

२४ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ५९ हजार

चांदी- २ लाख ७३ हजार

२५ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ५९ हजार ८००

चांदी- २ लाख ७५ हजार

Gold Rate Today
Gold Rate Today: सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ५५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

२६ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ५९ हजार

चांदी- २ लाख ७० हजार

२७ फेब्रुवारी

सोनं-१ लाख ५९ हजार

चांदी- २ लाख ७० हजार

२८ फेब्रुवारी

सोनं- १ लाख ६८ हजार

चांदी- २ लाख ९० हजार

१ मार्च

सोनं- १ लाख ७० हजार ५००

चांदी- २ लाख ९५ हजार

२ मार्च

सोनं- १ लाख ६६ हजार ५००

चांदी- २ लाख ९५ हजार

Gold Rate Today
Gold Rate Today: खुशखबर! होळीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळा ३००० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com