Jasprit Bumrah : चर्चांना पूर्णविराम, यॉर्कर किंगचा मैदानात उतरण्याचा दिवस ठरला..

Jasprit Bumrah IPL 2025 : जसप्रीत बुमराह आयपीएल खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मुंबई इंडियन्सने सकाळी दिली. मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बुमराह कोणत्या सामन्यापासून संघात खेळताना दिसेल याबद्दल सांगितले.
Jasprit Bumrah IPL 2025
Jasprit Bumrah IPL 2025x
Published On

Jasprit Bumrah Return IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याआधी मुंबईच्या संघाकडून मोठी घोषणा करण्यात आली. दुखापतग्रस्त असलेला जसप्रीत बुमराह आयपीएल खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करुन दिली. पण बुमराह कोणत्या सामन्यापासून संघात खेळताना दिसेल ही गोष्ट गुलदस्त्यात होती.

जसप्रीत बुमराह मुंबईच्या ताफ्यात सामील झाल्याचे समोर आले आहे. मुंबई इंडियन्सचे प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बुमराहच्या दुखापतीबाबत, त्याच्या खेळाबाबत आणि सामन्यातील उपलब्धतेबद्दल माहिती दिली. बुमराह मुंबईच्या कोणत्या सामन्यापासून नियमितपणे खेळताना दिसेल यावर जयवर्धने यांनी भाष्य केले.

Jasprit Bumrah IPL 2025
Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यापूर्वी महेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषद घेतली. जसप्रीत बुमराह आता मुंबईकडून खेळण्यासाठी फीट आहे. त्याने आज सरावदेखील केला. आरसीबी विरुद्धच्या सामन्यामध्ये बुमराह खेळू शकतो. काल रात्री बुमराह येथे आला. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या फिटनेस टेस्ट झाल्या. तो सध्या एमआय फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीत आहे. त्याने आज गोलंदाजी केली. आतापर्यंत सर्वकाही उत्तम सुरु आहे, असे महेला जयवर्धने म्हणाले.

Jasprit Bumrah IPL 2025
IPL 2025 सुरु असताना गुजरातच्या कर्णधारानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ती' तरूणी?

दरम्यान मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ मुंबई संघाच्या सरावा सत्रादरम्यानचा आहे. या कायरन पोलार्डच्या आजूबाजूला मुंबईचे खेळाडू उभे आहेत. आज जसप्रीत बुमराहने मुंबईच्या संघात कमबॅक केले. तो सराव सत्राला हजर होता. त्याच्या स्वागतार्थ पोलार्ड बोलत असल्याचे व्हिडीओ पाहिल्यावर समजते. 'वेलकम मुफासा' म्हणत पोलार्ड बुमराहला उचलून घेतो आणि बाकीचे खेळाडू टाळ्या वाजवतात असे व्हिडीओमध्ये दिसते.

Jasprit Bumrah IPL 2025
MS Dhoni : अखेर फैसला झालाच! एमएस धोनी निवृत्ती कधी घेणार? थालाने 'तो' क्षणच सांगितला

जसप्रीत बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरु शकते. मुंबईने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. फक्त एका सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला आहे. आता उद्याच्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत असल्याने मुंबईचा विजय होईल असा विश्वास चाहत्यांना आहे.

Jasprit Bumrah IPL 2025
Bumrah Boult Video : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढली! दोन मित्रांचे रियुनियन; आता खरी मजा येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com