Manasvi Choudhary
लांबसडक केसांवर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असल्यास तुम्ही मेसी वेणी ही स्टाईल करू शकता.
साडी किंवा ड्रेस कोणत्याही लूकवर मेसी वेणी हेअरस्टाईल उठून दिसते तुम्ही देखील करा.
केसांना एका बाजूला घेऊन दोन भाग करा आणि पातळ बटा घेऊन 'खजुरी वेणी' घाला.
मेसी वेणी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही खालचे केस कर्ल्स करू शकता यामुळे वेणी नीट बसते.
वेणी पूर्ण झाल्यावर ती बोटांनी बाजूला ओढून फुगीर बनवा. यामध्ये छोटे मणी किंवा खडे लावल्यास ती खूप उठून दिसते.
कानाच्या दोन्ही बाजूंनी केसांच्या बटला पिळ देऊन मागे नेले जाते आणि खाली उरलेल्या केसांची सैलसर वेणी घातली जाते.
केसांना एक पोनीटेल बांधून ठराविक अंतरावर रबर बँड्स लावले जातात आणि दोन रबर बँडमधील केस हाताने फुगवले जातात.