Squash Game Player Vasundhara Nagre saam tv
Sports

Sport Success Story: जिद्द, मेहनतीनं मिळतं यश; वाचा, स्क्वॉश खेळात फिनिक्ससारखी उंच भरारी घेणाऱ्या वसुंधरा नांगरेची कहाणी

Squash Game Player Vasundhara Nagre: धाराशिवमधील एका गावात राहणारी वसुंधरा नांगरेने स्क्वॉश खेळात मोठी कामगिरी केलीय. स्क्वॉश खेळाबाबत तिला माहिती कशी झाली, तिचा सराव कसा असतो, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

सकाळी सूर्यनमस्कर , व्यायाम करणं मग दीड ते दोन तास सराव त्यानंतर क्लास आणि मग शाळेत जाणं हा दिनक्रम आहे, वसुंधरा मुकुंद नांगरे या मुलीचा. आता तुम्ही म्हणाल असं ओपनिंग का? किंवा कोण ही वसुंधरा नांगरे? तर थांबा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लेखात मिळतील. आपल्या नावाची कोणी तरी दखल घेतली गेली पाहिजे, किंवा आपण काहीतरी किर्तीमान केला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला असंख्य मेहनत घ्यावी लागते.

स्क्वॉश सारख्या खेळात आपलं आणि देशाचं नाव जगभरात घेतलं जावं यासाठी वसुंधरा नांगरे धडपड करतेय. सकाळी ते संध्याकाळपर्यंतच्या आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत वसुंधरा स्क्वॉश खेळाचा सराव करतेय. धाराशिवमधील एका छोट्या गावात राहणारी वसुंधराने स्क्वॉश खेळाच्या अंडर १५ मध्ये मोठी कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावलाय. आता तिची नजर एशियन, ऑलम्पिकवर आहे. अशा नव्या दमाच्या खेळाडू वसुंधरा नांगरेशी केलेली खास बातचीत.

खेळाची आवड कशी निर्माण झाली?

स्क्वॉश खेळाबाबत आवडी कशी निर्माण कशी झाली, याबाबत माहिती देताना वसुंधरा नांगरे म्हणते, आधी या खेळाची तिला कल्पना नव्हती. पण आई-वडिलांना आणि बहिणीला या खेळाची माहिती होती. वसुंधराला खेळात रूची असल्याचं पाहून तिच्या पालकांनी तिला स्क्वॉश खेळाची निवड करण्यास सांगितलं. ओल्या मातीला आपण जसा आकार दिला तशी मूर्ती बनत असते, त्याचप्रमाणे वसुंधराने या खेळात प्राविण्य मिळवलंय. तिने पालकांच्या निर्णयाला सार्थक ठरवत स्क्वॉश खेळात मोठी कामगिरी केलीय.

या खेळाबाबत बोलताना तिने सांगितलं की, मला लहानपणापासून सायकल चालवणे,दोरीवर चढणे, भिंतीवर चालणे, पोहणे, कबड्डी, खो-खो कॅरम,कराटे, नृत्य करणे,यासारखे खेळ खेळायला खूप आवडत होते, असे धाडसी खेळ खेळण्यासाठी आई-वडील दोघेही प्रेरणा देत असतं. परंतु कोविडमुळे मैदानी खेळ बंद झाले. त्यामुळे मी स्क्वॉश या खेळाकडे जास्त आकर्षित झाले. या खेळामुळे शारिरिक व्यायाम उत्तम होतो. मन, मेंदू आणि मानसीकदृष्ट्या व्यक्ती सक्षम बनते. चपळता वाढते, त्याचमुळे आपल्याला या खेळाची आवड निर्माण झाल्याची माहिती वसुंधराने दिली.

यश मिळवण्यासाठी जिद्द असावी

वसुंधरा नांगरे हिचे आई-वडील हे पेशेने शिक्षक आहेत, मात्र एका शेतकरी कुटुंबातून आलेली वसुंधरा नवख्या खेळात दैदिप्यमान कामगिरी करत आहे. आठवीत शिकणारी वसुंधरा नांगरे या स्क्वॉश खेळाच्या अॅकेडमीमधून सराव करतेय. रविंद्र नवले आणि अभिनव सिन्हा हे तेच प्रशिक्षक आहेत. सुरुवातीला वसुंधरा आपल्या वडिलांसोबत स्क्वॉशचा खेळ खेळत होती. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र स्क्वॉश ओपनध्ये सहभाग घेतल्यानंतर तिला अभिनव सिन्हा यांच्या अॅकेडमीची माहिती मिळाली.

त्यानंतर तिने अॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला. या अॅकेडमीमार्फत वसुंधरा मुंबई,पुणे, गांधीनगर, इंदौर, सिकंदराबाद, चेन्नई, हैद्राबाद प्रयागराज, कानपूर अशा विविध ठिकाणच्या SRFI च्या स्पर्धा खेळली. प्रशिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे तिने अंडर-१५ मध्ये ऑल इंडियामध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय. योग्य मार्गदर्शन असले तर आपल्याला यश मिळते. प्रशिक्षकांच्या सुचनांचे पालन करणं आवश्यक असल्याचं वसुंधरा सांगते.

असा असतो सराव

आपल्या सरावाबाबत बोलताना वसुंधरा म्हणाली, दिवसाच्या सुरुवातीपासून माझा दिनक्रम सुरू होतो. सकाळी उठल्यानंतर जॉगिंग,धावण्याचा सराव. त्यानंतर सूर्यनमस्कार, दोर उड्या मारते. सकाळी व्यायाम करतान तिला तिचे वडील मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबत ती धावण्याचा सराव करते. दररोज दीड ते दोन तास सराव करते. ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते, त्या दिवशी सराव अधिक वेळ करते.

असा असतो दिनक्रम

सकाळी ५.१५ ते ५.४५ पर्यंत वडिलांसोबत धावण्याचा सराव, व्यायाम करणं . त्यानंतर सकाळी ६:०० ते ९:०० पर्यंत खाजगी क्लासेस. सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० शाळा असते. दुपारी ४:०० ते ५: ०० या वेळेत घरी थोड स्वंय अध्ययन. दररोज सायंकाळी 5:३० ते ७:०० पर्यंत स्क्वॉश खेळाचा सराव. संध्याकाळी ८: ०० वाजता जेवण त्यानंतर ८.३० ते ९.३० पर्यंत अभ्यास, नांगरेचा दिनक्रम असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT