
मेहनत, चिकाटी, आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी असल्यास आपल्याला यश नक्कीच मिळतं. याच तीन गोष्टींच्या ताकतीवर पु्ण्याची गोल्डन गर्ल अर्थात अनिका दुबे नवी भरारी घेण्यास सज्ज झालीय. स्क्वॉश गेममध्ये तीनदा नॅशनल विजेतेपद घेणारी अनिका दुबे, आता हॉगकॉगमधील अशियाई टीम चॅम्पियनशिपसाठी कसून तयारी करतेय. या चॅम्पियनशीपसाठी तिची तयारी कशाप्रकारे चालू आहे. याबाबतची माहिती तिने साम टीव्ही बोलताना दिलीय.
आपल्यातील कितीतरी लोक असतील त्यांना स्क्वॉश गेम माहिती नसेल. जसं नाव वेगळं तसा हा खेळही वेगळाच आहे बरं का. दहा ते १५ वर्षापूर्वी पाहिलं तर या खेळाविषयी कोणालाच काही माहिती नव्हतं. आता खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून बहुतेकजण हा खेळ खेळण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, हा खेळ काय आहे हे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर एका रॅकेटच्या साहाय्याने चेंडूला मार्क केलेल्या भिंतीवर मारायचं. त्यात जो जास्त पाईंट घेईल तो विजेता, असा हा गेम. हा खेळ टेनिस सारखा वैयक्तिक गेम आहे. यात प्रत्येक खेळाडूला ११ पाईंट घ्यायचे असतात.
जो खेळाडू ११ पाईंट सर्वात आधी करेल तो विजयी होत असतो. यात तीन डाव असतात. या तिन्ही डावात ११ पाईंट आधीच करावे लागतात. याच खेळात अनिका दुबे तरबेज झाली असून ती आता भारताचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहे. आशियाई टीम चॅम्पियनशीप अवघ्या काही दिवसांवर आलीय. ही स्पर्धा हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात होणार असून यासाठी अनिका दुबे दिवस रात्र घाम गाळत आहे.
अनिका दुबेला चॅम्पियनशीपच्या तयारीसाठी ब्रिटिश ज्युनिअर ओपन स्पर्धा महत्त्वाची ठरली. या स्पर्धेतून अनिका दुबेने हॉगकॉगच्या स्पर्धेची तयारी केलीय. पण या टुर्नामेंटमध्येमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे. १८ पेक्षा जास्त देश सहभाग घेणार आहेत, कारण ७० ते ८० देशांचे खेळाडू हा खेळ खेळत आहेत. दरम्यान आपल्या सरावाबाबत माहिती देताना अनिका दुबे म्हणाली, पुढील चॅम्पियनशीप डोळ्यापुढे ठेवून सराव वाढवलाय.
वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये खेळणं चालू आहे. दररोज सकाळ आणि संध्याकाळी दोन-दोन तासाचा सराव सुरू आहे. प्रशिक्षक अभिनव सिन्हा हे मुंबई असतात. तर अनिका दुबे पुण्यात असते, त्यामुळे सध्या हायब्रीड पद्धतीने सराव चालू असल्याचं तिने सांगितले. या स्पर्धेसाठी भारतातून चार खेळाडू हॉगकॉगला जाणार असून ही अनिका एकेरी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
याबाबत प्रशिक्षक सिन्हा म्हणाले, स्क्वॉश गेममध्ये तसं पाहिलं तर जगभरातील खेळाडू सहभागी होत असतात. परंतु यात वर्चस्व हॉगकॉग, मलेशिया या देशाचं राहिलंय. त्यामुळे या चॅम्पियनशिपमध्ये या खेळाडूंचा आव्हान इतर देशांच्या तुलनेत जास्त असेल. त्यादृष्टीने प्रॉक्टीस करून घेतली जातेय. फिटनेस आणि खेळाची तयारी केली जात आहे.
अभ्यास आणि प्रॉक्टीसचं व्यवस्थापनाविषयी बोलताना अनिका म्हणाली, आधी एक -दोन वर्ष खूप कठीण राहील. वेळंच बंधन पाळणं खूप कठीण होतं. पण नंतर हळूहळू ते सोपं होत गेलं आणि शिक्षण आणि सरावासाठी पुरेसा वेळ देता येऊ लागला. शाळेत परीक्षा असतात तेव्हा महिन्याभरापुर्वी अभ्यास सुरू करत असल्याचं अनिका म्हणते. अनिका खेळात जितकी तरबेज आहे तितकीच ती अभ्यासातही हुशार आहे.
अनिका दुबे ही या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्रातील सर्वात तरुण खेळाडू आहे. प्रतिभा, जिद्द आणि अथक परिश्रमामुळे अनिका या स्पर्धेत पोहोचलीय. तीन राष्ट्रीय विजेतेपदांसह तिने महाराष्ट्रातील पुण्यातील सर्वात यशस्वी ज्युनियर स्क्वॉशपटू म्हणून तिची ओळख निर्माण केलीय. अभिनव सिन्हा यांच्या अॅकेडमीतून तीनवेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारी अनिका पहिलीच खेळाडू असल्यानं तिला 'पुणे गोल्डन गर्ल' असं नाव देण्यात आलंय.
मुळात दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेतेपद घेतल्यानंतर हे गोल्डन गर्ल नाव देण्यात आलं होतं. यामागील कारण म्हणजे, त्यावेळी अनिका १३ वर्षाची होती. त्यात ती तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या खेळाडूंसोबत लढत करत होती.
अनिकाने अंडर १५ च्या वयोगटात खेळताना तिसरं राष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं. कोलकाता येथील सब ज्युनियर/ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये अंडर १५ श्रेणी जिंकणे हा एक अप्रतिम अनुभव होता. तिसऱ्यांदा नॅशनल चॅम्पियन बनणे ही एक आश्चर्यकारक गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अनिका दुबेने दिली होती. अनिकाची कामगिरी तरुण खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करतं.
अनिकाचे यश हे फक्त तिचे स्वतःचे नाही तर तिला विविध स्तरातून मिळालेल्या पाठिंब्याचा आणि मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. Chance2Sports च्या उपक्रमामुळे तिच्या कांगा किड्स कार्यक्रमाच्या पाठिंब्यानं अनिकाला इतक्या उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि एक्सपोजर मिळालंय. अनिकाचे प्रशिक्षक अभिनव सिन्हा, त्यांच्या शांत, प्रशिक्षण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या मार्गदर्शनामुळे अनिकाला एका दमदार ॲथलीटमध्ये बदलण्यात मदत झाली.
अनिकाच्या कठोर प्रशिक्षणाच्या तासांमागे आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवण्यामागे तिचे पालकांचीही मदत झाली. त्यांनी भावनिक आणि तार्किक आधार दिला आहे. जेव्हा तिला कधी पराभवाचा सामना करावा लागला, तेव्हा त्यांनी तिला मानसीक आधार दिला. त्यांचे प्रोत्साहन तिला तिच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास महत्त्वपूर्ण आहेत.
स्क्वॉश खेळाविषयी आपल्यातील बहुतेकांना जसं माहिती नव्हतं. तसं अनिकाला देखील आधी या खेळाविषयी माहिती नव्हतं. तिच्या घराशेजारी स्क्वॉश खेळाचं कोर्ट असल्यानं तेथील खेळाडूंना खेळ खेळताना पाहत-पाहत अनिकाला या खेळाविषयी आवड निर्माण झाली. अनिका सुरुवातील इतर खेळही खेळत होती, परंतु हा स्क्वॉश खेळ सर्वाधिक आवडला. ऑलम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यानंतर भारतातून अनेक खेळाडू यात भाग घेत आहेत.
याबाबत बोलताना प्रशिक्षक सिन्हा म्हणाले, ज्यावेळी अनिका अॅकेडमीत आली होती, त्यावेळी एक वर्ष खेळाविषयीच निष्ठा पाहिली. तितक्या गंभीरपणे हा खेळ खेळते हे जाणून घेतलं. त्यानंतर अनिकाला राष्ट्रीय स्तरावरील खेळात उतरवण्याचा निर्णय घेतला. अनिकाची शिकून घेण्याची सवय चांगली आहे. कोणती गोष्ट तिला सांगितलं तर ती गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेते.
प्रत्येकवेळी प्रशिक्षक म्हणून तिच्या पाठीमागून राहून सराव करून घेण्यटी गरज नसते. तिचा हा गुण आपल्याला आवडत असल्याचं सिन्हा म्हणाले. सध्या हायब्रीडपणे सराव चालू आहे. अनिकाचे समर्पण आणि लक्ष अतुलनीय आहे. ती निडर आणि शिकत राहण्यास उत्सुक आहे, त्यामुळे तिला प्रशिक्षक बनवण्याचा आनंद मिळतो. आठवड्यातील दोन दिवस ती मुंबईत येत सराव करते. त्यामुळे स्वत: काही शिकण्याची सवय खूप चांगली आहे. स्क्वॉश खेळाबाबत तिच्या पालकांना परवानगी दिली होती. पालकांना या खेळाविषयी माहिती असल्यानं त्यांची परवानगी घेण्यास कोणतीच अडचण आली नसल्याचं सिन्हा म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.