Maharashtra Kesari : पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केलं चितपट

Maharashtra Kesari 2024-25 : आज महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यामध्ये भाग्यश्री फंडने अमृता पुजारीचा पराभव केला. २-४ च्या फरकाने भाग्यश्रीला जेतेपद मिळाले.
Bhagyashree fund wins women maharashtra kesari
Bhagyashree fund wins women maharashtra kesariSaam Tv
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mahila Maharashtra Kesari : भाग्यश्री फंड ही यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरली आहे. आज (२५ जानेवारी) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्याच खेळला गेला. २-४ गुणांच्या फरकाने भाग्यश्रीने सामना जिंकत महिला महाराष्ट्र केसरी २०२४-२५ वर आपले नाव कोरले.

वर्ध्याच्या देवळीतील रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यात भाग्यश्री फंडने जेतेपद मिळवत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवली. या विजयाचे श्रेय भाग्यश्रीने तिच आई, वडील आणि पती यांना दिले आहे. मिळालेल्या सहकार्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत.

स्पर्धा जिंकल्यानंतर तिने माध्यमांसमोर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, "मी सर्वांना धन्यवाद करते. या विजयात माझे आईवडील, माझे पती आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. कुस्तीपटूंचे कष्ट त्यांनाच माहीत असतात. जे जिंकतात त्यांनी कष्ट केले असतात आणि जे हरतात त्यांनीही खूप मेहनत घेतलेली असते. हरणाऱ्यांनी पुढच्या वेळेस प्रयत्न करावे."

ती पुढे म्हणाली, "महिला महाराष्ट्र केसरीचे आयोजन अतिशय सुंदर होते. असे आयोजन दरवर्षी व्हावे. जसजश्या स्पर्धा वाढतील, तसतसं मुलींचा स्पर्धेत सहभाग वाढेल. तो वाढत आहे हे चांगली बाब आहे. सरकारने खेळाडूंना जितकी आर्थिक मदत करता येईल तितकी करावी. कारण अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते."

Bhagyashree fund wins women maharashtra kesari
Ajinkya Rahane: लाईव्ह सामन्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! आऊट होऊनही रहाणे परत फलंदाजीला आला- VIDEO

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघच्या मान्यतेने ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु करण्यात आली होती. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष रामदास तडस यांनी यंदाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून ३५० महिला कुस्तीगीर सहभागी झाल्या होत्या. पन्नास आंतरराष्ट्रीय पंचांनी देखील स्पर्धेत उपस्थिती लावली होती.

Bhagyashree fund wins women maharashtra kesari
IND vs ENG: आर्चरने 150.3KMPH च्या स्पीडने टाकला बॉल, तिलक वर्माने रॉकेट स्पीडने पाठवला मैदानाबाहेर - VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com