Maaya Rajeshwaran : भारताच्या माया राजेश्वरनचं अटीतटीच्या लढतीत जोरदार कमबॅक; अवघ्या १५ वर्षांच्या महिला टेनिसपटूची मोठी कमाल

maaya rajeshwaran News : भारताच्या १५ वर्षांच्या माया राजेश्वरनने अटीतटीच्या लढतीत मोठी कमाल केली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या टेनिसपटूने एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
maaya rajeshwaran
maaya rajeshwaran
Published On

मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या 15वर्षीय माया राजेश्वरन हीने आपली विजयी मालिका कायम ठेवत मुख्य फेरीत प्रवेश केला.

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत 15वर्षीय माया राजेश्वरन हीने जागतिक क्रमवारीत जेसिका फैला चा 7-6(9), 1-6, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. याआधी तिने काल जागतिक क्र.265 खेळाडू निकोल फोस्सा हूर्ग्योवर सनसनाटी विजय मिळवला होता. मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत माया समोर ग्रेट ब्रिटनच्या युरिको लीली मियाझाकीचे आव्हान असणार आहे.

maaya rajeshwaran
Tennis Premier League च्या लिलावात या महिला खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली! रोहन बोपण्णालाही सोडलं मागे

माया म्हणाली, मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझे पहिले ध्येय हे मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश करणे होते आणि ते ध्येय पूर्ण झाले आहे. तिसऱ्या सेटमध्ये मला खूप संघर्ष करावा लागला, पण सामना जिंकल्यामुळे मला आनंद झाला आहे.

माया पुढे म्हणाली की, भारतात मी ज्या ठिकाणी टेनिस खेळायला जायचे त्या ठिकाणीं माझे वडिल सोबत असायचे. त्यांनी मला शांतपणे खेळण्यास व पाठींबा देण्यास नेहमीच मदत केली आहे'.

maaya rajeshwaran
Paris Olympics 2024,Table Tennis: भारतीय पोरींनी पॅरिस गाजवलं! रोमानियाला नमवत रचला इतिहास

'प्रत्येक संघर्षपूर्ण लढतीत त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. याशिवाय माझ्या आईने देखील माझ्यासोबत स्पर्धेसाठी वेळोवेळी प्रवास केला आहे. गेली अनेक वर्षे अमलगम स्टील यांचा पाठिंबा लाभला आहे, असे तिने पुढे सांगितले.

स्पर्धेबाबत बोलताना ती म्हणाली की, वाईल्ड कार्ड द्वारे मला या स्पर्धेत खेळण्याची संधी दिल्यामुळे व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मी मनापासून आभार मानते

maaya rajeshwaran
Tennis News: नोवाक जोकोविच फिरवणार फ्रेंच ओपन, विम्बल्डनकडे पाठ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com