Tennis Premier League च्या लिलावात या महिला खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली! रोहन बोपण्णालाही सोडलं मागे

Tennis Premier League 2024 Auctions: आगामी टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सोहळा पार पडला.
Tennis Premier League च्या लिलावात या महिला खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली! रोहन बोपण्णालाही सोडलं मागे
tpl 2024twitter
Published On

टेनिस प्रीमियर लीगचे ५ पर्व यशस्वीरीत्या पार पूर्ण केल्यानंतर सहाव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे . या स्पर्धेत सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा बुधवारी (२५ सप्टेंबर) मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे पार पडला. या सोहळ्याला टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू लिएंडर पेस, सानिया मिर्झा आणि महेश भूपती हे देखील उपस्थित होते.

टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडूंसह बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि सोनाली बेंद्रे देखील या लिलाव सोहळ्याला उपस्थित होती. दरम्यान आगामी स्पर्धेसाठी मजबूत संघ निवडण्यासाठी आठही फ्रेंचायझींनी पूर्ण जोर लावला.

या खेळाडूंवर लागली मोठी बोली

आर्मेनियाची २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यानने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला. तिच्यावर ४२.२० लाख अशी सर्वोच्च बोली लागली. तिला पंजाब पेट्रियॉट्स संघाने खरेदी केले.

पेट्रियॉट्स संघाने पुरूष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेचीला ५ लाख या मूळ किंमतीत खरेदी केली.

गतविजेत्या बेंगळुरू एसजी पायपर्स संघाने दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या खेळाडूची खरेदी करताना दोन वेळचा ग्रॅण्ड स्लॅम मिश्र दुहेरी विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याच्यासाठी ४२ लाख रुपये मोजले. रोहन गुप्ता यांच्या मालकीच्या व एसजी स्पोर्टसचा मुख्य अधिकारी महेश भूपती याचा पाठिंबा असलेल्या बेंगळुरू संघाने लिलावात उशिरा भाग घेतला. तरीही ऑलिम्पिकपटू अंकिता रैनाला ५ लाख रुपयांत खरेदी करताना आपल्या संघाची ताकद वाढवली. त्यांनी दुहेरी स्पेशलिस्ट अनिरुद्ध चंद्रशेखरवर ४ लाख रुपये बोली लावली.

Tennis Premier League च्या लिलावात या महिला खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली! रोहन बोपण्णालाही सोडलं मागे
TPL 2024: टेनिस प्रीमियर लीगचा रोमांच आणखी वाढणार! ग्रॅन्ड स्लॅम विजेता खेळाडू झळकणार

रामकु पतगिर यांच्या मालकीच्या गुजरात पँथर्स सुमित नागलची ३५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तर भारतातील अव्वल क्रमांकाची सहजा यमलापल्लीवर ७.८० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

राहुल तोडी यांच्या मालकीच्या श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स संघाला लिएंडर पेसचा पाठिंबा आहे. अन्य संघाकडूनही चुरस मिळत असतानाही दिल्ली संघाने टेनिसपटू रोहन बोपण्णाची खरेदी करून बाजी मारली. २०२४ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळवणाऱ्या रोहन बोपण्णाला संघात समाविष्ट करून दिल्ली संघाने निर्णायक कामगिरी बजावली.

Tennis Premier League च्या लिलावात या महिला खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली! रोहन बोपण्णालाही सोडलं मागे
TPL 2024: टेनिस प्रिमियर लीगचे सहावे पर्व मुंबईत! या मैदानावर रंगणार सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com