Sania Mirza: बिर्याणी, शिरखुर्मा आणि बरंच काही; सानिया मिर्झाने सांगितला ईदचा प्लान

Sania Mirza Eid Celebration : संपूर्ण देशभरात आज ईद साजरी केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात ईद साजरी करणार आहे. माजी टेनिसपट्टू सानिया मिर्झादेखील आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करणार आहे. याबाबत तिने माहिती दिली आहे.
Sania Mirza
Sania MirzaInstagram @mirzasaniar

Sania Mirza Eid Celebration Plan:

संपूर्ण देशभरात आज ११ एप्रिलला ईद साजरी केली जात आहे. देशभरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करताना दिसत आहे. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडूदेखील ईद साजरी करणार आहे. देशातील टेनिसपट्टू सानिया मिर्झादेखील आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करणार आहे. 'आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्यासाठी ईद हा सण आहे', असं सानिया मिर्झाने सांगितले आहे. (Latest News)

सानिया मिर्झाने नुकतचं एका मुलाखतीत या वर्षीची ईद कशी साजरी करणार आहे, याबाबत माहिती दिली आहे. सानियाने सांगितले की, 'याआधी कामानिमित्त मी सतत फिरत असायची. त्यामुळे ईदच्या दिवशी मी घरी नसायची. परंतु आता गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या घरच्यांसोबत ईद साजरी करत आहे. यामुळे मला सणाचा खरा अर्थ आणि भावना समजल्या आहे. यावर्षी मी हैदराबादमध्ये माझ्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करणार आहे. माझा मुलगा ईझानदेखील आमच्यासोबत ईद साजरी करणार आहे. ईझानला भारतातील वेगवेगळे सण, संस्कृती समजून घेता येणार आहे, याचा मला जास्त आनंद आहे'.

सानियाने तिच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 'लहानपणी आम्ही ईदीची खूप जास्त वाट पाहायचो. ईदच्या दिवशी पाहुण्यांकडून, घरातील मोठ्या व्यक्तींकडू मिळणारी ईदी ही खूप स्पेशल असायची. मी आता मोठी झाल्यामुळे मला जास्त ईदी मिळत नाही', असं तिने सांगितले.

Sania Mirza
Swapnil joshi: म्हणून स्वामींचं महत्त्व खूप आहे... मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी स्वामींच्या भक्तीत दंग

सानिया या वर्षी आपल्या कुटुंबियांसोबत ईद कशी साजरी करणार आहे याबाबत म्हणाली की, 'आम्ही सर्वप्रथम प्रार्थना करुन ईद साजरी करतो. त्यानंतर आईवडिलांच्या घरी ईदसाठी बिर्याणी, शिर खुर्मा असे अनेक पदार्थ खातो. ईदच्या दिवशी जवळपास आम्ही १५- २० नातेवाईक एकत्र येऊन ईद साजरी करतो. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्यासाठी ईद ही उत्तम संधी आहे. मी हैदराबादमध्ये असते तेव्हा आम्ही संपूर्ण कुटुंबिय मोठ्या उत्साहात ईद साजरी करतो'.

Sania Mirza
Juna Furniture Movie: महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'मधील 'काय चुकले सांग ना ?' गाणं रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com