Smriti Mandhana Saam Tv
Sports

Smriti Mandhana: लग्न मोडलं, हृदय तुटलं पण खचली नाही, स्मृतीने केली नव्याने सुरुवात, भावाने शेअर केला फोटो

Smriti Madhana Cricket Practice Photo After Wedding Cancel: स्मृती मंदानाचे लग्न मोडल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती आगामी मॅचसाठी प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

Siddhi Hande

पलाशसोबतचे लग्न मोडल्यानंतर स्मृती पहिल्यांदाच स्पॉट

आगामी मॅचसाठी प्रॅक्टिस करताना दिसली

भाऊ श्रवण मंदानाने शेअर केले फोटो

भारतीय क्रिकेट टीमची उप कर्णधार स्मृती मंदाना सध्या चांगलीच चर्चेत आहे.स्मृती मंदाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचे पलाश मुच्छलसोबत लग्न मोडलं आहे. स्मृतीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यानंतर आता स्मृती पुन्हा एकदा देशासाठी उभी राहिली आहे. ती सध्या आगामी क्रिकेट मॅचसाठी तयारी करताना दिसत आहे.

लग्न मोडल्याची माहिती (Smriti Mandhana Wedding Cancel Post)

स्मृतीने ८ डिसेंबर रोजी लग्न मोडल्याची माहिती दिली. यानंतर ती पुन्हा एकदा मैदानात दिसली आहे. ती ट्रेनिंग किट घालून फलंदाजी करताना दिसत आहे. वैयक्तिक आयुष्यातील दुःखाला बाजूला ठेवून स्मृतीने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे.

स्मृती मंदानाच्या भावाने श्रवण मंदानाने प्रॅक्टिस करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप जास्त व्हायरल होत आहे.यावरुन स्मृतीने आपले वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळं ठेवलं आहे.

स्मृतीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही बोलणे टाळले आहे. तिने सांगितले की,भारतासाठी खेळणे हे तिचे प्राधान्य असणार आहे.त्यानंतर आता स्मृती पुन्हा एकदा मैदानात सज्ज झाली आहे. तिने पुढच्या मॅचसाठी तयारी करण्यास घेतली आहे. तिचा ट्रेनिंगदरम्यानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मृतीच्या आगामी मॅच (Smriti Mandhaa Upcoming Match)

स्मृती २१ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध टी २० सीरीजमध्ये खेळताना दिसत आहे. यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमधील वुमन प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्येही खेळताना दिसणार आहे. ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (Royal Challengers Bengluru) कॅप्टन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

आज चंद्र सिंह राशीत; कोणत्या राशींना मिळणार यश आणि कोणासाठी आहे ‘लकी डे’?

Maharashtra politics : मुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर कौतुक, एकनाथ शिंदेंची भविष्यावर नजर? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT