

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?
संभाव्य तारीख आली समोर
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. दरम्यान, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.
या दिवशी येऊ शकतात पैसे (Ladki Bahin Yojana February Installment May Come on These Date)
फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. मार्च महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये योजनेबाबत तरतुद केली जाऊ शकते. यानंतर लगेचच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या ४ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील, असं बोललं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा केली जाईल.
या महिलांनाच मिळणार लाभ
लाडकी बहीण योजनेतून लाखो लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांच्या केवायसीमध्ये दुरुस्ती आहे त्यांना हप्ता जमा होण्यास उशिर होऊ शकतो. त्यांना केवायसीमधील दुरुस्ती झाल्यानंतरच सर्व रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.