

श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण कार-ट्रक अपघात.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू.
कारचा पूर्ण चक्काचूर; अपघाताची तीव्रता मोठी.
सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. ५ जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आता मृतांची नावे समोर आली आहेत.
पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्रथामिक माहिती मिळाली होती. मात्र आता आलेल्या ताज्या माहितीनुसार, जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे. भीषण अपघातात श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
श्रीरामपूर येथील चव्हाण कुटुंबीयांनी दहा दिवसांपूर्वीच सेकंडहँड कार विकत घेतली होती. आज चव्हाण कुटुंबीय आपल्या लहान चिमुकल्यांसह तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र खंडाळा गावानजीक स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. यात कारमधील प्रशांत रमेश चव्हाण वय 24 वर्ष, संगीता अनिल चव्हाण वय 40 वर्षे, सिद्धार्थ सुनील चव्हाण वय 16 वर्ष, सारिका अनिल चव्हाण वय 30 वर्ष, ऐश्वर्या अशोक चव्हाण वय 26 वर्ष आणि 3 वर्षीय ऋत्वी अशोक चव्हाण अशा सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर 6 वर्षीय रुद्र अशोक चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली आहे.
मयत -
1) प्रशांत रमेश चव्हाण 24 वर्ष ( मयत )
2) संगीता अनिल चव्हाण 40 ( मयत )
3) सिद्धार्थ सुनील चव्हाण 16 वर्ष ( मयत )
4) सारिका अनिल चव्हाण 30 वर्ष ( मयत )
5) ऋत्वी अशोक चव्हाण 3 वर्ष ( मयत )
6) ऐश्वर्या अशोक चव्हाण 26 वर्ष ( मयत )
जखमी -
7 ) रुद्र अशोक चव्हाण 6 वर्ष ( गंभीर जखमी, लोणी येथे उपचार सुरू)
अपघात झाल्यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळील शासकीय रुग्णालयात पाठवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.