

कोकणकन्या व मांडवी एक्स्प्रेसला कायमस्वरूपी जादा डबे.
3 टियर इकॉनॉमी कोचची वाढ.
मुंबई–गोवा प्रवाशांना सीट टेन्शनमधून दिलासा.
कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. यातच सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना सीट न मिळण्याचं टेन्शन दूर होणार आहे.
कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक २०१११ आणि ट्रेन क्रमांक २०११२ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा कोकणकन्या एक्स्प्रेस ट्रेनला ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. आज २५ फेब्रुवारी २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेसप्रमाणेच ट्रेन क्रमांक १०१०३ आणि ट्रेन क्रमांक १०१०४ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा मांडवी एक्स्प्रेस ट्रेनलाही ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आलाय. यामुळे सुमारे १६६ अधिक जागा कायमच्या वाढतील. या दोन्ही ट्रेन LHB डब्यांसह चालवल्या जातात. कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला सध्या फर्स्ट एसी+ २ टियर एसीचा १ डबा, २ टियर एसीचा १ डबा, ३ टियर एसीचे ४ डबे, ३ टियर इकॉनॉमीचे २ डबे, स्लीपर ०७ डबे, जनरल ०४ डबे, खानपान सेवेचा १ डबा, जनरेटर कार १ डबा आणि एसएलआर याचा १ डबा असतो. यासह एकूण २२ कोचसह या दोन्ही ट्रेन चालवल्या जातात. आता ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आल्याने दोन्ही ट्रेन २३ कोचसह धावतील.
मुंबई- सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस आता सुधारित संरचनेसह पूर्णपणे वातानुकूलित गाडी म्हणून चालविण्यात येईल.
गाड्यांचा तपशील आणि सुधारित संरचना खालील प्रमाणे:
(अ) मुंबई- मडगांव कोकणकन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसची सुधारित संरचना:
ट्रेन क्रमांक २०१११ / २०११२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्सप्रेस आणि
ट्रेन क्रमांक १०१०३/ १०१०४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस :
१ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय, १ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ३ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ पॅन्ट्री कार, १ जनरेटर कार आणि १ द्वितीय बैठक आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन (२३ एलएचबी कोच)
ट्रेन क्रमांक 20111 दिनांक २५.०२.२०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगांव कोकणकन्या एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 20112 दिनांक २४.०२.२०२६ पासून मडगांव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 10103 दिनांक २५.०२.२०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव मांडवी एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 10104 दिनांक २५.०२.२०२६ पासून मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
(ब) मुंबई - सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 12219/12220 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेसची सुधारित संरचना:
: १ प्रथम वातानुकूलित, ४ वातानुकूलित द्वितीय, १२ वातानुकूलित तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार (२० एलएचबी कोच).
ट्रेन क्रमांक 12219 दिनांक २५.०४.२०२६ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालवण्यात येईल.
ट्रेन क्रमांक 12220 दिनांक २४.०४.२०२६ पासून सिकंदराबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.