Indian Railways: रेल्वेच्या नियमात मोठे बदल! किलोमीटरप्रमाणे लागणार भाडे, 200 किमीच्या प्रवासाठी मोजावे लागतील 150 रुपये

Railway Rules: भारतीय रेल्वेने २०२६ पासून अंतरानुसार भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर भाडे, RAC आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
Indian Railway Fare Change
Indian Railwaysgoogle
Published On

नव्या वर्षात दरवर्षी अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये बदल होत असतात. त्यामध्ये एक मोठा निर्णय भारतीय रेल्वेने घेतलेला आहे. २०२६ मध्ये 'अमृत भारत एक्सप्रेस' (Amrit Bharat Express) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र या रेल्वेच्या तिकीटांच्या बुकींगमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आपण पुढील बातमीत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नव्या ट्रेनची बुकींगची नियमावली आधीपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. त्यामध्ये भाडे वाढ किंवा तिकीटाची रक्कम बदलणार नाही, मात्र आता प्रवासाचे अंतरावरुन भाडे ठरवण्यात येणार आहे. त्यामध्ये स्लीपर क्लाससाठी 200 किलोमीटरचं भाडं हे 149 रुपये इतकं असणार आहे. म्हणजेच प्रवासी जर 100 किलोमीटरचा प्रवास करत असला, तरीही त्याला 200 किलोमीटरचे भाडे द्यावे लागणार आहे. दुसरीकडे, सामान्य डब्याने प्रवास करणाऱ्यांसाठी 50 किलोमीटरचे भाडे 36 रुपये असेल.

Indian Railway Fare Change
Bandhani Dress: बांधणीच्या ड्रेसच्या 'या' आहेत हटके डिझाइन्स, दिसाल सिंपल अन् आकर्षित

अमृत भारत II एक्सप्रेसच्या स्लीपर क्लासमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. या गाड्यांमध्ये आता RAC तिकीटाची सुविधा उपलब्ध नसेल. अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन कालावधी पहिल्याच दिवसापासून सर्व बर्थ (Birth Tourists) प्रवाशांसाठी पूर्णपणे उपलब्ध असेल. पण आरक्षित नसलेल्या द्वितीय श्रेणीसाठी जुने नियमच लागू राहतील.

स्लीपर क्लासमध्ये आता फक्त तीनच भाग उपलब्ध असणार आहेत. महिला, दिव्यांगजन आणि वरिष्ठ नागरिक यांच्यासाठीच कोटा लागू केला जाईल. रेल्वे बोर्डाने वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोअर बर्थ देण्याची सुविधा स्पष्ट केली आहे. 60 वर्षांवरील पुरुष आणि 45 वर्षांवरील महिलांना शक्य असल्यास प्रणालीद्वारे आपोआप लोअर बर्थ देण्याचा प्रयत्न केला जाईल. उपलब्धतेनुसार ही बर्थ देण्यात येईल.

दरम्यान, तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा 24 तासांच्या आत सुरू करण्याचं उद्दिष्ट रेल्वेने ठेवलं आहे. आरक्षित तिकिटांसाठी आता फक्त डिजिटल माध्यमातूनच पेमेंट स्वीकारले जाणार आहे. काउंटरवर तिकीट खरेदी करतानाही डिजिटल पेमेंटचा वापर करता येईल. पण काही कारणांमुळे डिजिटल पेमेंटमध्ये अडथळे आले असतील तर अशा प्रकरणांमध्ये नियमांनुसारच रिफंड दिला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Indian Railway Fare Change
Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com