MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

MSRTC Shivshahi Buses : महाराष्ट्र सरकार एमएसआरटीसीच्या शिवशाही बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची योजना आखत आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे आणि प्रवाशांच्या घटत्या प्रतिसादामुळे अर्ध-लक्झरी आणि सामान्य सेवांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.
MSRTC Shivshahi Buses
Maharashtra State Road Transport Corporation plans conversion of 453 Shivshahi buses into semi-luxury and ordinary models.saam tv
Published On
Summary
  • शिवशाही बस नव्या स्वरूपात रस्त्यावर धावणार.

  • ४५३ बसांचे निमआराम आणि साध्या बसमध्ये रूपांतर.

  • तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांच्या तक्रारींमुळे निर्णय.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील 'शिवशाही' बसबाबत राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली शिवशाही आता नव्या साध्या अवतारात रस्त्यावर धावताना दिसेल, असे सांगितले जात आहे. सततचे बिघाड आणि प्रवाशांचा घटता प्रतिसाद पाहता, महामंडळाच्या मालकीच्या ४५३ शिवशाही बस आता निमआराम आणि साध्या बसमध्ये रूपांतर केल्या जाणार आहेत.

MSRTC Shivshahi Buses
MSRTC: आता खेड्या-पाड्यातही जाणार एसटी; दुर्गम भागातही पोहोचेल लालपरी,परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

एसटी महामंडळाकडे स्वमालकीच्या एकूण ६८८ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ४५३ बसेस सध्या सुस्थितीत आहेत. मात्र या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, वातानुकूलित यंत्रणेतील तक्रारींमुळे या बसचे रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवशाही बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवासी या बसकडे पाठ फिरवत आहेत, हे शासनानेही कबूल केल्याचे सांगितले जातंय.

MSRTC Shivshahi Buses
Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होणार आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३X२ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बसची खरेदी करण्यात आलीय. या नव्या बसला 'हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ' यांचे नाव देण्यात आले आहे.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सन्मानजनक करण्यासाठी ही सेवा सुरू केली जातेय. या बसेसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. मार्च २०२६ पासून या बस टप्प्याटप्प्याने राज्याच्या विविध आगारांमध्ये दाखल होणार आहेत. सुरुवातील अतिशय वर्दळीच्या आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या आधुनिक बसमध्ये ३ बाय २ अशा पद्धतीची आसन रचना असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com