Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?

Iran- Israel War: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक झाले असून ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. जगभरामध्ये शिया मुस्लिम यांची लोकसंख्या किती आहे? भारतामध्ये किती जण राहतात? घ्या जाणून...
Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?
Shia MuslimsSaam Tv
Published On

Summary -

  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर जगभरातील शिया मुस्लिम आक्रमक झाले आहेत

  • जगभरात शिया मुस्लिमांची संख्या २० ते २६ कोटी आहे

  • इराण, इराक, अझरबैजान, बहरीन, लेबनॉन आणि येमेनमध्ये शिया मुस्लिम बहुसंख्य

  • भारतात ३ ते ५ कोटी शिया मुस्लिम राहतात

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीला संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाले. यामुळे इराणमधील शिया मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये आंदोलन आणि निदर्शने केली जात आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूमुळे फक्त इराणमधील शिया मुस्लिमच नाही तर जगभरातील शिया मुस्लिमही शोक व्यक्त करत आहेत. इराण युद्धानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अशांततेदरम्यान शिया आणि सुन्नी मुस्लिमांबद्दल जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

इस्लाममध्ये शिया मुस्लिम सुन्नी मुस्लिमांपेक्षा कमी संख्येने आहेत. शिया मुस्लिम स्वतःला पैगंबर मुहम्मद आणि त्यांचे चुलत भाऊ आणि जावई हजरत अली यांचे वंशज मानतात. ते सुन्नी मुस्लिमांसारखे पहिले तीन खलीफांना नाहीतर अलीलाच आपला पहिला इमाम मानतात. जगभरामध्ये शिया मुस्लिम यांची लोकसंख्या किती आहे? हे आपण जाणून घेणार आहोत...

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?
Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान UAE मध्ये अडकली अक्षय कुमारची हिरोईन, पोस्ट करत म्हणाली- "भयानक परिस्थिती, मला घरी जायचे..."

जगभरातील मुस्लिम समुदाय हा एक मोठा आणि वैविध्यपूर्ण समुदाय आहे. अंदाजानुसार जगभरात शिया मुस्लिमांची संख्या अंदाजे २० कोटी ते २६ कोटी आहे. एकूण इस्लामिक लोकसंख्येच्या टक्केवारी म्हणून त्यांचा विचार केल्यास, ते एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १० टक्के ते १३ टक्के आहेत. म्हणजेच प्रत्येक १०० मुस्लिमांपैकी १० ते १३ मुस्लिम शिया आहेत. जगभरात शिया मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. असे काही देश आहेत जिथे शिया मुस्लिम बहुसंख्य आहेत. अशा देशांच्या संस्कृती, सामाजिक-सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिया समुदाय हा जागतिक मुस्लिम समुदायाचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली घटक मानला जातो.

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?
Israel-Iran War: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे पश्चिम आशियात अडकले महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक; यादी आली समोर, कोण-कोणत्या जिल्ह्यातील आहेत पर्यटक?

इराण, इराक, अझरबैजान, बहरीन, लेबनॉन आणि येमेनमध्ये शिया मुस्लिमांची संख्या मोठी आहे. या देशांमध्ये शिया मुस्लिम लोकसंख्या ३५ टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत आहे. इराणच्या लोकसंख्येच्या ९० ते ९५ टक्के शिया मुस्लिम आहेत. अझरबैजानमध्ये ६५ ते ७५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. बहरीनमध्ये ६५ ते ७५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. इराकमध्ये ६५ ते ७० टक्के लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. लेबनॉनमध्ये अंदाजे ४५ ते ५५ टक्के शिया मुस्लिम असून ते राजकीयदृष्ट्या खूप मजबूत आहेत. येमेनमध्ये लोकसंख्येच्या ३५ ते ४५ टक्के लोक शिया मुस्लिम आहेत.

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?
Israel Iran War : इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला; इराणच्या दाव्यानं खळबळ

भारतातील शिया मुस्लिम लोकसंख्येचा विचार केला तर इराणनंतर भारतात मोठ्या संख्येने शिया मुस्लिम राहतात. जरी ते भारतात अल्पसंख्याक असले तरी इराणनंतर सर्वात जास्त शिया मुस्लिम असलेला भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात अंदाजे ३ कोटी ते ५ कोटी शिया मुस्लिम आहेत. भारतातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या १० ते १५ टक्के शिया मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर आणि हैदराबाद सारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिया मुस्लिम राहतात.

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?
Iran-Israel War: इराणनं अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडलं, हवेतच आगीचा गोळा बनलं अन्...; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com