इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटलं; इकडं ताजमहलवर ड्रोनच्या घिरट्या, देशात खळबळ

Fact Check Drone Spotted Near Taj Mahal During Iran Israel Conflict: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आग्र्यातील ताजमहालवर ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याने खळबळ उडाली. मात्र चित्रीकरणासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
Drone sighting near the Taj Mahal triggered panic before authorities confirmed it was part of an authorized filming project.
Drone sighting near the Taj Mahal triggered panic before authorities confirmed it was part of an authorized filming project.Saam Tv
Published On

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. दुबईमध्ये पुन्हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सौदी अरबमध्ये देखील मोठी खळबळ माजली आहे. दुबईच्या बंदर आणि बुर्ज खलिफाजवळ हल्ले झाले होते. इस्रायलने आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनीई यांच्यासह 48 नेते ठार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल दिल्लीमध्ये बैठक ही पार पडली. सौदी अरबमध्ये अनेक भारतीय अडकल्याने भीतीचे वातावरण आहे.

https://dainik.bhaskar.com/Oc8ZquO880b

अशातच काल रविवारी सकाळी आग्रा येथील ताजमहालवर एक ड्रोन उडताना दिसला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. अचानक ड्रोन दिसल्याने उपस्थितांना धक्का बसला. ड्रोनचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र नंतर असे सांगण्यात आले की शूटिंगसाठी परवानगी घेण्यात आली होती.

Drone sighting near the Taj Mahal triggered panic before authorities confirmed it was part of an authorized filming project.
मोठी बातमी! महाराष्ट्रातील खासदार अडकले इराण-इस्रायल युद्धात, दुबईतून आली महत्त्वाची अपडेट

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन चित्रीकरणासाठी उडवण्यात आला होता. अक्षरधाम येथे दाखवल्या जाणाऱ्या माहितीसाठी ताजमहालचे दृश्ये चित्रित करण्यासाठी एक टीम आली होती. या प्रकल्पाद्वारे, ताजमहलचा समावेश करून पर्यटनाला चालना देण्याची योजना आहे, ज्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) मुख्यालयाकडून योग्य परवानगी घेण्यात आली होती.

Drone sighting near the Taj Mahal triggered panic before authorities confirmed it was part of an authorized filming project.
Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

दरम्यान, वरिष्ठ संवर्धन सहाय्यक प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितले की ही टीम गुजरातहून आली होती आणि सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच ड्रोन उडवण्यात आला. यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com