Israel Iran War : इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला; इराणच्या दाव्यानं खळबळ

Israel Iran conflict breaking news : इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणने केला असून, नेतन्याहूंबाबत अधिक सविस्तर माहिती देण्यात आली नाही.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने केला आहे. तसेच इस्रायलच्या वायूसेनेचे कमांडरच्या ठिकाणालाही टार्गेट करण्यात आले. रिपोर्टनुसार, हा हल्ला नियोजनपूर्वक करण्यात आला आहे, असं आयआरजीसीच्या पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटने म्हटलं आहे. या हल्ल्यात खैबर शेकन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केला असला तरी, पंतप्रधानांबाबत स्पष्टपणे माहिती देण्यात आली नाही.

फार्स न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, पंतप्रधानांचं कार्यालय आणि वायेसेनेच्या कमांडरचे मुख्यालय टार्गेटवर होते. मध्यपूर्वेत तणाव टोकाला पोहोचला असतानाच हा दावा करण्यात आला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायलकडून मात्र या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com