भारतीय महिला संघांची उपकर्णधार स्मृती मानधना आणि सिने संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेले काही दिवस सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. २३ नोव्हेंबर २०२५ ला होणारा दोघांचा लग्नसोहळा अचानक स्थगित करण्यात आला. त्यावेळी स्मृतीच्या वडीलांची प्रकृती बिघडल्याचं कारण समोर आलं होतं. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छल हा स्मृतीशी एकनिष्ठ नसल्याच्या पोस्ट समोर आल्या होत्या. त्यानंतर रविवारी स्मृतीने स्वत: लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे.
मला हे संपूर्ण प्रकरण इथेच संपवायचं आहे. मी तुम्हाला विनंती करते की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या. भारतासाठी खेळत राहणं हेच माझं ध्येय आहे. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे.
स्मृती-पलाश यांचा लग्नसोहळा स्थगित झाल्यानंतर स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नासंबंधित फोटो, व्हीडिओ डिलीट केले होते. स्मृतीने टीम इंडियामधील तिच्या खास मैत्रिणींबरोबर साखरपुडा झाल्याची घोषणा करत एक खास व्हीडिओ शेअर केला होता, तो व्हीडिओही स्मृतीने डिलीट केला. दरम्यान पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे
मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरे जाईल, असं पलाशने सांगितले
दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलंय. दरम्यान वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती आणि पलाश नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात एकत्र दिसले होते. याचवेळी पलाशने स्मृतीला गुलाब आणि अंगठी देऊन प्रपोज केले होते. वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद ताजा आहे. त्यात स्मृतिच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना सेलिब्रेशनसाठी आणखी एक कारण मिळालं होतं. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. आता सगळं संपल असलं तरी स्मृती या खडतर प्रसंगातून बाहेर पडून नव्यानं आयुष्याला सामोरं जाईल, अशी आशा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.