Sakshi Sunil Jadhav
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार बॅट्समन स्मृती मानधना आणि प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल हे दोघे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबरला होणारे त्यांचे लग्न अचानक पुढे ढकलण्यात आले. कारण स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली.
त्यानंतर सोशल मिडियावर दोघांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या. काही रिपोर्ट्समध्ये तर पलाशने स्मृतीला धोका दिल्याचे दावेही करण्यात आले. याचबरोबर, दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचेही दावे व्हायरल झाले आहेत.
सध्या, लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने आपल्या सर्व प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओज इन्स्टाग्रामवरून हटवले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये जास्तच उत्सुकता आणि कुतूहल वाढले आहे.
23 नोव्हेंबर 2025ला स्मृती आणि पलाश यांचे लग्न होणार होते, सर्व तयारीही सुरू होती. लग्नाच्या काही दिवस आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले.
लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर दोघांबद्दल विविध अफवा आणि तर्क-वितर्क सुरू झाले. काही रिपोर्ट्समध्ये पलाशने स्मृतीला धोका दिल्याचे चुकीचे दावे करण्यात आले.
पुढे आपण याबद्दल सत्य जाणून घेणार आहोत. मुळात हे पूर्णपणे चुकीचे दावे आहेत. स्मृती मानधना अजूनही इंस्टाग्रामवर पलाश मुच्छलला फॉलो करतात. त्यांच्या 'फॉलोइंग' यादीत पलाशचे नाव दिसत आहे.
सोशल मीडियावर 'दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले' असा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तपासणी केल्यावर हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले. स्मृती अजूनही पलाशला फॉलो करतात. मात्र, स्मृतीने आपल्या सर्व प्री-वेडिंग फोटोज आणि व्हिडिओज डिलीट केले आहेत.
यामुळे दोघांच्या नात्यावरून प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये सस्पेन्स आणि चर्चा वाढत आहे. दोन्ही कुटुंबांकडून मात्र कोणत्याही ब्रेकअपची किंवा वादाची अधिकृत माहिती दिलेली नाही फक्त लग्न पुढे ढकलले आहे.