Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि दूरदर्शी विचारवंत होते. त्यांच्या चाणक्य नितीमध्ये मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे अनेक उपदेश आजही मार्गदर्शक ठरतात.
चाणक्यांच्या मते काही गोष्टी अशा असतात की, त्यात लाज वाटून चालत नाही. धैर्य दाखवणं गरजेचं असतं. नाहीतर व्यक्ती संधी गमावतो आणि आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.
ज्ञानाच्या पाठीमागे जाणं हे कोणत्याही वयात शक्य आहे. विद्या हेच खरे धन आहे. जो शिकणं थांबवतो, त्याचा विकास थांबतो.
चूक मानणारा व्यक्तीच पुढे जातो. चूक लपवणं म्हणजे मूर्खपणा आहे. तर क्षमा मागणं ही कमजोरी सुद्धा नाही.
कोणतंही काम लहान नसतं. मेहनतच खरा मान आणि सन्मान देते. आत्मनिर्भरतेसाठी पुढाकार घ्या.
चाणक्यांच्या मते, योग्य गोष्ट बोलणं ही जबाबदारी असली पाहिजे. सत्य समाजाला आणि मनाला मजबूत करतं. वेळेवर बोललं नाहीतर आपण कोणालाच साथ देणार नाही.
अत्याचार आणि अन्याय सहन करणे हे पाप आहे. अधिकार जाणून घ्या आणि योग्य वेळी वापरा. स्वाभिमानासाठी ठाम उभे राहा.
शरीर आणि मनाची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे. आजार लपवून तो अधिक वाढवू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काळ कोणाची वाट बघत नाही. आली संधी तर धैर्याने पाऊल टाका. भीतीमुळे संधी गमावू नका.