Tomato Chutney: टोमॅटो आवडत नाही? मग 'ही' गावरान स्टाईल चटणी बनवा

Sakshi Sunil Jadhav

भाजी खाऊन कंटाळलात?

वरण भातासोबत रोजच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने चटणी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनतीची गरज भासणार नाही. पुढे आपण याची रेसिपी आणि काही टिप्स जाणून घ्या.

Tomato Chutney

ताजे टोमॅटो निवडा

स्वच्छ धुतलेले आणि लालसर पिकलेले टोमॅटो या रेसिपीसाठी उत्तम असतात. याने चटणीचा रंग आणि चव दोन्ही अप्रतिम होते.

Tomato Chutney

थेट आगीवर भाजा

गॅस फ्लेमवर किंवा चुलीवर टोमॅटो दोन्ही बाजूने भाजा, साल काळपट आणि आतील भाग मऊ होईपर्यंत ते भाजा. म्हणजे टोमॅटो व्यवस्थित भाजला की चटणी लगेचच तयार होईल.

roasted tomato chutney

साल काढा

टोमॅटो थोडे थंड झाल्यावर त्यांची जळलेली साल काढून टाका. काळपट सालं चटणीत कडवटपणा आणतात.

tomato chutney recipe

मॅश करून पेस्ट करा

शिजलेला मऊ टोमॅटो बशीत घेऊन चमच्याने बारीक करा. तुम्ही मॅशर सुद्धा वापरू शकता.

tomato chutney recipe

भाज्या मिसळा

चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारिक चिरून टाका.

gavran style chutney

मसाले घाला

मीठ, लाल तिखट आणि चिमूटभर हळद मिसळा. एक चमचा मोहरीचे तेल वरून टाका ही गावाकडील खासियत आहे.

gavran style chutney

मिक्स करून सर्व्ह करा

सर्व साहित्य छान एकत्र करा आणि चव चाखून मसाले मिक्स करा. थंडीच्या दिवसांत भाकरी, पराठा, खिचडी किंवा भातासोबत खाल्ल्यास चव अप्रतिम लागेल.

gavran style chutney

NEXT: आळशीपणामुळे वाढेल कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली सुरुवातीची लक्षणे

cancer symptoms
येथे क्लिक करा