sri lanka  twitter
Sports

SL vs NZ 2nd Test: श्रीलंकेची आघाडी 500 पार.. न्यूझीलंडचा अवघ्या 88 धावांवर पॅकअप

Sri lanka vs New Zealand 2nd Test: श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे.

Ankush Dhavre

न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आधी दमदार फलंदाजी आणि त्यानंतर धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंची पळता भूई थोडी केली आहे.

एकापेक्षा एक स्टार फलंदाज असलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या ८८ धावांवर आटोपला आहे. या सामन्यात गोलंदाजी करतानात प्रभात जयसूर्याने मोलाची भूमिका बजावली .त्याने ४२ धावा खर्च केल्या आणि न्यूझीलंच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं. या सामन्यात श्रीलंकेने मोठी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात प्रभात जयसूर्याच्या फिरकी गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सनही जयसूर्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. या डावात ५ गडी बाद करताच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९ व्यांदा ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला.

श्रीलंकेकडे भक्कम आघाडी

या सामन्यात न्यूझीलंडचा डाव ८८ धावांवर आटोपल्यानंतर श्रीलंकेने ५१४ धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा ५०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ५८७ धावांची आघाडी घेतली होती. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी आघाडी घेण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ७०२ धावांची आघाडी घेतली होती.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने ६०२ धावांचा डोंगर उभारला. या डावात गोलंदाजी करताना कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस आणि दिनेश चांदीमल यांनी शतकी खेळी केली. दिनेश चांदीमलने ११६ धावा केल्या. तर कामिंदू मेंडिस १८२ धावांवर नाबाद राहिला. त्याला साथ देत कुसल मेंडिसनेही नाबाद १०६ धावांची शानदार खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT