IND vs BAN: टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले.. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कानपूरच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे.
IND vs BAN: टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले.. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट
indian cricket teamtwitter
Published On

India vs Bangladesh 2nd Test Live Updates: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १८० धावांनी बाजी मारली होती. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला होता. तर सामन्यातील दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर वाढल्याने भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये परतले आहेत.

खेळाडू हॉटेलमध्ये परतले

या सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाची इनकमिंग आणि आऊट गोइंग सुरु होती. शेवटी पावसाचा जोर वाढल्याने पहिल्या दिवसाचा खेळ २ तासाआधीच संपवण्यात आला .त्यामुळे पहिल्या दिवशी अवघ्या ३५ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल, असं म्हटलं जात होतं. मात्र ईएसपीएन क्रिकेइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेश संघातील खेळाडू हॉटेलमध्ये परतले आहेत.

IND vs BAN: टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले.. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट
IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान?

या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी ९:३० वाजता सुरु होणार होता. मात्र सकाळपासून सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये. ड्रेसिंग रुममध्ये बसून राहण्यापेक्षा खेळाडूंनी हॉटेलमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशीही पूर्ण खेळ होण्याची शक्यता खूप कमी आहे.

IND vs BAN: टीम इंडियाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले.. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट
IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल

पहिल्या दिवशी काय घडलं?

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. बांगलादेशकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या, शदनाम इस्लामने २२ धावांची खेळी केली. कर्णधार शांतो ३१ धावांवर माघारी परतला. तर मोमिनुल हक ४० धावांवर आणि मुशफिकुर रहीम ६ धावांवर नाबाद आहे. बांगलादेशने आतापर्यंत ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने पहिल्या दिवसाचा खेळ अवघ्या ३५ षटकात आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com