IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल

Virat Kohli Copying Jasprit Bumrah Bowling Action Viral Video: भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल
virat kohlitwitter
Published On

Virat Kohli Copied Jasprit Bumrah Bowling Action: भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा थरार कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत बांगलादेशच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. दरम्यान सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कानपूर कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना, भारतीय खेळाडू मस्ती करताना दिसून आले. दरम्यान सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि रविंद्र जडेजासमोर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसून आला आहे. हे पाहून सर्वांनाच हसू आवरलं नाही. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल
IND vs BAN: आकाश दीप रॉक्स! रोहित शर्मा शॉक! हिटमॅनची रिॲक्शन तुफान व्हायरल - VIDEO

विराटने बुमराहची गोलंदाजी अॅक्शन कॉपी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा लाईव्ह सामन्यात बुमराहच्या गोलंदाजी अॅक्शनची नकल केली आहे. बुमराहने या सामन्यातील पहिल्या दिवशी ९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने १९ धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही. गेल्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ४ फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

IND vs BAN: किंग कोहली रॉक्स! लाईव्ह सामन्यात बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर Video व्हायरल
IND vs BAN : नाणेफीकीचा कौल भारताच्या बाजूने, बांगलादेशच्या संघात दोन बदल, पाहा प्लेईंग ११

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. बांगलादेशला पहिल्या दिवशी ३ गडी बाद १०७ धावा करता आल्या आहेत. बांगलादेशकडून नजमूल हुसेन शांतोने ३१ धावा केल्या. तर मोमिनूल हक ४० धावांवर नाबाद आहे. भारताकडून गोलंदाजी करताना आखाश दीपने २ गडी बाद केले. तर आर अश्विनला १ गडी बाद करता आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com