IND vs BAN 2nd Kanpur Test Live Updates : भारत आणि बागलादेशमध्ये दुसरा कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. कानपूर कसोटीमध्ये नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केला नाही. तर बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
कानपूर कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी सकाळी पावसाने बॅटिंग केली. पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला उशीर झाला. कर्णधार रोहित शर्माने कानपूर कसोटीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचा कसोटी सामना जिंकून WTC मध्ये अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला असेल. भारतीय संघाने चेन्नईतील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. तर बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
बांगलादेशच्या संघात दोन बदल -
चेन्नई कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर बांग्लादेश संघाने आपल्या प्लेईंग ११ मध्ये दोन महत्वाचे बदल केले आहेत. नहीद आणि टस्कीन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. तर खालिद अहमद आणि तैजुल इस्लाम यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय.
IND vs BAN 2nd Test Live, Day 1: टीम इंडियाचे ११ शिलेदार
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
IND vs BAN 2nd Test Live, Day 1: बांगलादेशच्या ताफ्यात कोण कोण?
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.