SL vs NZ, Kamindu Mendis Record: न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आले. दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजाने राडा घातला आहे. पहिल्याच दिवशी २५ वर्षीय फलंदाज कामिंदू मेंडिसने रेकॉर्ड ब्रेक खेळी केली आहे.
या युवा फलंदाजाने आपल्या छोट्याश्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत शानदार कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या आठव्या कसोटी सामन्यात त्याने असा काही कारनामा करून दाखवला आहे, जो क्रिकेट विश्वातील दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आणि डॉन ब्रॅडमन यांनाही जमला नव्हता.
श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत श्रीलंकेने ३ गडी बाद ३०६ धावा केल्या. यादरम्यान कामिंदू मेंडिस ५१ धावांवर नाबाद परतला. या अर्धशतकी खेळीसह तो सलग ८ सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कुठल्याही फलंदाजाने सलग ८ सामन्यात अर्धशतकं झळकावली नव्हती.
यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानचा फलंदाज सऊद शकीलच्या नावावर होता. पाकिस्तानच्या या फलंदाजाने कसोटीत पदार्पण केल्यानंतर सलग ७ सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावली होती. या यादीत भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचा देखील समावेश आहे. यासह पाकिस्तानचे सईद अहमद यांचा देखील समावेश आहे. या फलंदाजांनी पदार्पण केल्यानंतर सलग ६ सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली होती.
कामिंदू मेंडिसच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ८५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावे ४ शतक आणि ५ अर्धशतक झळकाण्याची नोंद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.