IND vs BAN 2nd Test : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्टपूर्वी दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती; 'हा' ठरणार शेवटचा सामना

India vs Bangladesh 2nd Test kanpur : कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये शुक्रवारी दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
India vs Bangladesh 2nd Test kanpur
India vs Bangladesh 2nd Test kanpursaam tv
Published On

उद्यापासून कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एका दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. सामन्याच्या एक दिवस आधी निवृत्ती जाहीर केल्याने चाहते हैराण झाले आहेत. हा खेळाडू बांगलादेशाच्या टीमचा आहे.

बांगलादेशाच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

बांगलादेशचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेची टेस्ट सिरीज त्याची शेवटची असणार आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूरमध्ये होणारा टेस्ट सामना हा आपला शेवटचा टेस्ट सामना असल्याचं शाकिबने सांगितलंय.

India vs Bangladesh 2nd Test kanpur
CSK सोडण्यासाठी धोनीला तब्बल २५ कोटींची ऑफर, नेमकं सत्य काय?

सध्या बांगलादेशाची परिस्थिती पाहता त्याठिकाणी टेस्ट सिरीज होणं काहीसं कठीण आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाविरूद्ध ग्रीन पार्कमध्ये होणारा टेस्ट सामना हा त्याचा शेवटचा ठरू शकतो.

चेन्नईच्या टेस्टमध्ये निराशाजनक कामगिरी

भारताविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शाकिब अल हसनला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. तसंच फलंदाजीमध्ये शाकिबने पहिल्या डावात ३२ रन्स तर दुसऱ्या डावामध्ये २५ रन्सची खेळी केली होती. त्याच्या या खराब कामगिरीनंतर त्याच्या फीटनेसवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. टी-२० वर्ल्डकपनंतर शाकिबने त्या फॉर्मेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

कशी आहे शाकिबची कारकिर्द?

शाकिब अल हसनने आतापर्यंत ७० टेस्ट सामन्यांमध्ये ४६०० रन्स केले आहेत. याचसोबत त्याने २४२ विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-२० त्याने १२९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २५५१ रन्स केले होते. तर वन डे क्रिकेटमध्ये २४७ सामन्यांत ७५७० रन्स आणि ३१७ विकेट्स त्याने घेतलेत.

India vs Bangladesh 2nd Test kanpur
IPL 2025: ...तर रोहित-सूर्यकुमार MI सोडून जाऊच शकत नाहीत; आयपीएलपूर्वी BCCI घेणार मोठा निर्णय?

शाकिबवर अटकेची टांगती तलवार

बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं अन् शेख हसिना यांचं सरकार पडलं. शाकीब याच सत्ताधारी पार्टीमधील एक खासदार होता. बांगलादेशमधील आंदोलनकर्ता रुबेल याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये शाकीब अल हसन याच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे बांगलादेशमध्ये पोहोचताच कोणत्याही क्षणी शाकीबला अटक होऊ शकते.

शाकीब दुखापतग्रस्त असताना देखील भारतात राहणं पसंत करतोय का? असा प्रश्न विचारला जात होता. शाकिब भारतात आला आणि दुखापत असताना खेळला सुद्धा... आता त्याने थेट निवृत्ती जाहीर केल्याने बांगलादेश क्रिकेटसाठी मोठा धक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com