आयपीएल २०२५ पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएलकडे सर्वांचं लक्ष आहे. असं म्हटलं जातंय, आयपीएल २०२५ पूर्वी बीसीसीआय काही खास नियम जाहीर करणार आहे. काही मिडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझींना किमान ५ खेळाडूंना रिटेन म्हणजेच संघात कायम राखण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक फ्रेंचायझी कोणत्या ५ खेळाडूंना रिटेन करणार हे पाहावं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की, महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएलमध्ये खेळणार का?
काही दिवसांपूर्वी BCCI आणि फ्रँचायझी मालक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतून, बऱ्याच फ्रेंचायझींचा मेगा ऑक्शनला विरोध असल्याचं जाणवलं. यावेळी फ्रेंचायझीने ५-६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली असल्याची माहिती आहे.
फ्रेंचायझी मालकांच्या विनंतीनुसार, बीसीसीआय ५ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांचं या निर्णयानंतर सर्व टीमकडे लक्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे मुंबई, कोलकाता तसंच चेन्नई यांच्या टीमचा फॅनबेस जास्त आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये ४१ वर्षीय MS Dhoni याच्याही आयपीएल २०२५ खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. धोनीनेही अजून याबाबत आपला निर्णय कळवलेला नसल्याचं CEO काशी विश्वनाथ यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता एक अशी बातमी समोर आलीये की, महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडण्यासाठी काही कोटींची ऑफर देण्यात आली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये चांगली केली आहे. यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जेतेपदाच्या शर्यतीत मुंबईला टक्कर दिली आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान गेल्या सिझनमध्ये धोनीने नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे धोनीच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.
धोनीला चेन्नईच्या टीममध्ये कमी किमतीत कायम राखता यावं यासाठी अनकॅप्ड खेळाडूचा नियम आणण्याची विनंती CSK ने केल्याची बातमी देखील समोर आली होती. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. अशातच आता आणखी एक फोटो व्हायरल झाला असून त्यात MS Dhoni ला चेन्नई सुपर किंग्समधून बाहेर पडण्यासाठी CSK चे CEO विश्वनाथ यांनी २५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान हा केवळ एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यामध्ये किती तथ्य आहे, याची पडताळणी करण्यात आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.