आगामी आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यावेळी सर्व क्रिकेट चाहत्यांचं मुंबई इंडियन्सच्या टीमकडे खास लक्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे यंदाच्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझीला किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी असणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यामध्ये प्रत्येक टीम त्यांच्या मुख्य खेळाडूंना रिटेन करण्यावर भर देतील म्हणजे त्यांची ब्रँड वॅल्यू अबाधित राहील.
अशातच समोर आलेल्या बातम्यांनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI IPL फ्रँचायझींना 5 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. दरम्यान बीसीसीआयने असा निर्णय घेतला तर मेगा ऑक्शनदरम्यान टीम्सना राईट टू मॅचचा पर्याय राहणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा सर्वाधिक फायदा मुंबई इंडियन्सला होऊ शकणार आहे. या नियमानुसार, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला रिटेन करण्याची संधी टीमला मिळणार आहे.
नुकतंच बीसीसीआय त्यांच्या मुख्यालयात एक बैठक घेतली आहे. यावेळी बीसीसीआयने सर्व 10 टीम मालकांसह खेळाडूंच्या रिटेनरशिपवर चर्चा केली. यावेळी बहुतेक फ्रँचायझींना 5-6 खेळाडू कायम ठेवायचे होते. दरम्यान फ्रेंचायझींच्या या मुद्द्यावर बीसीसीआयने विचार केला आहे.
2022 च्या सिझनपूर्वी फ्रेंचायझींना तीनपेक्षा जास्त भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंना कायम ठेवू नये असं बंधन होतं. दरम्यान आयपीएल 2025 मध्ये किती भारतीय आणि विदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतात हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
यावेळी बीसीसीआय पाच खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सची टीम काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडिन्सने चार खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रोहितला सर्वाधिक 16 कोटी रुपये मिळाले, त्यानंतर बुमराहला 12 कोटी रुपये, सूर्यकुमार 8 कोटी रूपये मिळाले होते.
दरम्यान पाच खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय आला तर मुंबई इंडियन्ससाठी हा चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या आणि कदाचित तिलक वर्मा यांना रिटेन केलं जाऊ शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.