SL vs NZ: 5 नव्हे तर 6 दिवस चालणार कसोटी सामना! वाचा काय आहे कारण?

Sri Lanka vs New Zealand Test Series: श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना रंगणार आहे. हा कसोटी सामना ५ नव्हे तर ६ दिवसांचा असणार आहे.
SL vs NZ: 5 नव्हे तर 6 दिवस चालणार कसोटी सामना! वाचा काय आहे कारण?
new zealand yandex
Published On

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेटचा सामना हा पाच दिवसांचा असतो. मात्र श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा कसोटी सामना हा पाच नव्हे तर सहा दिवसांचा असणार आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

SL vs NZ: 5 नव्हे तर 6 दिवस चालणार कसोटी सामना! वाचा काय आहे कारण?
Team India News: बांगलादेशची खैर नाय! शमी,बुमराहपेक्षाही खतरनाक गोलंदाज कमबॅकसाठी सज्ज

कसोटी क्रिकेटचा फिव्हर सुरू झाला आहे. इंग्लंडमध्ये श्रीलंकेचा संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. ही मालिका झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या मालिकेला १८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंत होणार होता. मात्र हा सामना २३ सप्टेंबरपर्यंत खेळवला जाईल. कारण २१ सप्टेंबरला रेस्ट डे असणार आहे.

SL vs NZ: 5 नव्हे तर 6 दिवस चालणार कसोटी सामना! वाचा काय आहे कारण?
Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

काय आहे कारण?

मालिकेचं वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डने आपल्या प्रेस रिलीजमध्ये ही माहिती दिली आहे. या प्रेस रिलीजमध्ये लिहिलं गेलंय की, ' पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान रेस्ट डे ठेवण्यात आला आहे. स्पेशालिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंकामध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबरला रेस्ट डे ठेवण्यात आला आहे. म्हणजे या दिवशी एकही षटकाचा खेळ होणार नाही.

असं आहे वेळापत्रक

पाहिला कसोटी सामना - १८ ते २३ सप्टेंबर

दुसरा कसोटी सामना - २६ ते ३० सप्टेंबर

कसोटी क्रिकेटमध्ये ६ दिवसांचा कसोटी सामना होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ६ दिवसांचा सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी फुल मुनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com