IND vs ENG : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, अवघ्या ५० धावांवर ७ फंलदाज तंबूत

IND vs ENG Live Score 3rd Test : टीम इंडियाने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची हवा काढली आहे. टीम इंडियाने दिलेल्या ५५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ७ गडी तंबूत परतले आहेत. या सामन्यात टीम इंडिया भक्कम स्थितीत आहे
IND vs ENG
IND vs ENG x
Published On

IND vs ENG Live Score 3rd Test Day 4:

इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये या मालिकेचा तिसरा सामना सुरु आहे. मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची हवा काढली आहे. टीम इंडियाने दिलेल्या ५५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ७ गडी तंबूत परतले आहेत. या सामन्यात टीम इंडिया भक्कम स्थितीत आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून ४३० धावा केल्या. भारताच्या यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात दुसरं शतक ठोकलं. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ३१९ धावांवर ऑलआऊट झाला. तर पहिल्या डावात टीम इंडियाने ४४५ धावा केल्या. पहिल्या डावात इंडियाने १२६ धावांची आघाडी घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IND vs ENG
IND Vs ENG Test Live : पदार्पणातच 'सरफराज'ची विक्रमाला गवसणी; अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. आजच्या चौथ्या दिवशी शुभमन गिल आणि कुलदीप यादव या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची पिसे काढली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचे ७ गडी माघारी परतवले आहेत.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची सुरुवात खराब सुरु झाली. बेन डकेट लवकर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या ७ व्या षटकात डकेट धावबाद झाला. तर जॅक क्रॉलीच्या रुपात इंग्लंडला दुसरा धक्का बसला. त्यानंतर ओली पोपच्या रुपात तिसरा धक्का बसला.

IND vs ENG
Badminton Asia Team Championships Final: भारताच्या मुलींनी रचला इतिहास; थायलंडचा पराभव करत पटकावलं विजेतेपद

रविंद्र जडेजानेही इंग्लंडला जेरील आणलं. जॉनी बेयरेस्टोच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बाद झाल्यामुळे इंग्लंडची विजयाची वाट खडतर झाली. जडेजाने पुन्हा इंग्लंडला पाचवा धक्का दिला. जो रुट हा ७ धावांवर बाद झाला. जडेजानंतर कुलदीप यादने इंग्लंडला सहावा धक्का दिला. बेन स्टोक्स १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने पुन्हा इंग्लंडला सातवा धक्का दिला. इंग्लंडचा रेहान अहमद शून्य धावांवर बाद झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com