IND Vs ENG Test Live : पदार्पणातच 'सरफराज'ची विक्रमाला गवसणी; अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

IND Vs ENG Test Live : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. सामन्यात यशस्वी जयस्वालने जबरदस्त द्विशतक साजरं केलं. जयस्वालचं हे सलग दुसरं द्विशतक होतं.
IND Vs ENG Test Live
IND Vs ENG Test LiveSaam Digital
Published On

IND Vs ENG Test Live

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. सामन्यात यशस्वी जयस्वालने जबरदस्त द्विशतक साजरं केलं. जयस्वालचं हे सलग दुसरं द्विशतक होतं. तर आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या सरफराज खानने देखील धडाकेबाज खेळी करत दोन डावात दोन अर्धशतके ठोकली आहे.

सरफराज खानने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात 65 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने 72 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. पहिल्या डावातही सरफराजने अर्धशतक झळकावले होते. मात्र, तो दुर्दैवाने धावबाद झाला.

सरफराज खान पदार्पणाच्या सामन्यात दोन डावात अर्धशतके झळकावणार पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी ही कामगिरी दिलावर हुसैन, सुनील गावस्कर, श्रेयस अय्यर, शेफाली वर्मा यांनी केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पदार्पणात दोन अर्धशतक झळकावणारे भारतीय

दिलावर हुसैन (1934) - इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 59 आणि दुसऱ्या 57 धावा

सुनील गावस्कर (1971) - वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात नाबात 67 धावा

श्रेयस अय्यर (2021)- न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 105 आणि दुसऱ्या डावात 65 धावा

शेफाली वर्मा (2021) - इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 96 आणि दुसऱ्या डावात 63 धावा

सरफराज खान (2024) - इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 62 धावा आणि नाबात 68 धावा

IND Vs ENG Test Live
IND Vs ENG Test Live: राजकोटवर 'यशस्वी'चं वादळ, इंग्लडविरुद्ध ठोकलं दुसरं द्विशतक

भारताचा दुसरा डाव

भारताने 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 319 धावांवर ऑल आउट झाला होता. टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. अशारितीने भारताने 556 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्याडावात यशस्वी जयस्वालने 214 धावा केल्या. सर्फराजने 68 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 158 चेंडूत 172 धावांची भागीदारी झाली. त्याआधी शुभमन गिल 91, कुलदीप यादव 27, रोहित शर्माने 19 धावा केल्या.

IND Vs ENG Test Live
IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वालने शतक झळकवल्यानंतर बाद नसतानाही मैदान का सोडलं? कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com