इंग्लंडचा संघ श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसून येणार आहे. नुकताच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी -२० मालिकेचा थरार पार पडला. या मालिकेतील टी-२० मालिकेत श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला.
तर वनडे मालिकेत भारतीय संघाने दमदार कमबॅक करत भारतीय संघाला धुळ चारली. ही मालिका झाल्यानंतर आता श्रीलंकेचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला होता. ही स्पर्धा खेळत असताना तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. या दुखापतीमुळे तो केवळ एका सिजनसाठी नव्हे, तर जवळपास एक वर्षासाठी संघातून बाहेर पडला आहे. इंग्लंडसमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.
कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे संघाबाहेर होणं, हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. कारण इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत आहे. बेन स्टोक्स संघाबाहेर झाल्यानंतर त्याच्याऐवजी ओली पोप संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीत म्हटले की, ' स्टोक्स इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा कसोटी सामना ७ ऑक्टोबर रोजी मुल्तानमध्ये रंगणार आहे. बोटाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जॅक क्रॉलीही पाकिस्तान दौऱ्यातून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.'
भारतीय संघाविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळल्यानंतर श्रीलंकेचा संघ आता कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २१ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. तर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला २९ आणि तिसऱ्या कसोटी सामन्याला ६ सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे.
बेन स्टोक्स बाहेर झाल्यानंतर इंग्लंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ओली पोपकडे सोपवण्यात आली आहे. पोपकडे फलंदाजीसह नेतृत्वातही चांगली कामगिरी करण्याचा दबाव असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.