सेम टू सेम! ENG vs SL कसोटीत 2 बेन स्टोक्स दिसले मैदानात; VIDEO तुफान व्हायरल

Ben Stokes Lookalike Video: इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत २ बेन स्टोक्स मैदानात दिसून आले आहेत.
सेम टू सेम! ENG vs SL कसोटीत 2 बेन स्टोक्स दिसले मैदानात; VIDEO तुफान व्हायरल
ben stokestwitter
Published On

सध्या श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत सुरु आहे. या सामन्यादरम्यान स्टँडमध्ये एक स्पेशल फॅन इंग्लंडला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी बेन स्टोक्सचा ड्यूप्लिकेट मैदानात आल्याचे पाहायला मिळाले.

हजारो फॅन्सच्या गर्दीत कॅमेरामनने बेन स्टोक्सच्या ड्यूप्लिकेटला शोधून काढलं. मोठ्या स्क्रिनवर दिसताच त्याने हात वर केले. त्याने इंग्लंडची जर्सी आणि जॅकेट परिधान केलं होतं. मोठ्या स्क्रिनवर दिसल्यानंतर त्याने जॅकेट काढलं आणि ५५ नंबरची स्टोक्स नाव असलेली जर्सी बेन स्टोक्सला दाखवली. बेन स्टोक्सनेही त्याला थम्स अप दिला. बेन स्टोक्सने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सेम टू सेम! ENG vs SL कसोटीत 2 बेन स्टोक्स दिसले मैदानात; VIDEO तुफान व्हायरल
Ben Stokes Record: बेन स्टोक्सने रचला इतिहास! तब्बल 43 वर्षांनंतर कसोटीत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

स्टोक्स कसोटी मालिकेतून बाहेर

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये. मालिका सुरु होण्यापूर्वीच तो दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी त्याला हॅमस्ट्रींगचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी ऑली पोपकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सेम टू सेम! ENG vs SL कसोटीत 2 बेन स्टोक्स दिसले मैदानात; VIDEO तुफान व्हायरल
Ben Stokes Statement: 'हे आहे तरी काय...' रांचीची खेळपट्टी पाहून बेन स्टोक्स हादरला, म्हणाला...

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव २३६ धावा करता आल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ३५८ धावा करता आल्या. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने २०४ धावा केल्या आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत दुसऱ्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com