shivendraraje bhosale saam tv
Sports

Satara: महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी घेतलेले पैसे गेले कुठं? शिवेंद्रसिंहराजे

आज शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी पाच लाख रुपये जाहीर केले.

ओंकार कदम, Siddharth Latkar

सातारा : महाराष्ट्र केसरीचा (maharashtra kesari) किताब पटकावलेल्या मल्लाकडून नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या (satara) संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी उपस्थित केला आहे. (prithviraj patil latest marathi news)

महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या पृथ्वीराज पाटीलने केवळ गदा मिळाली राेख रक्कम मिळणं अपेक्षीत हाेते अशी खंत साम टीव्हीकडे व्यक्त केली. पृथ्वीराजची खंत साम टीव्हीनं दाखविल्यानंतर अनेकांनी त्यास बक्षीसं जाहीर केली.

दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही. याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही.

मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे असे म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT