Video: भीषण अपघातात ब्रह्मानंद पडळकरांसह तिघे जखमी; बंधू गोपीचंद साता-याहून रवाना

आज गाेपीचंद पडळकर यांनी सातारा दाैरा साेडून विटा गाठले.
accident vehicle
accident vehiclesaam tv

सांगली : सांगली (sangli) जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या वाहनाचा आज (रविवार) भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रह्मानंद हे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांचे मोठे बंधू असून त्यांचा अपघात झाल्याचे समजताच आमदार पडळकरांनी सातारा (satara) दाैरा अर्ध्यातच साेडून गावी रवाना झाले. (gopichand padalkar latest marathi news)

एका कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुढ्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या वाहनाचा दुपारी विटा कुंडल रस्त्यावर अपघात झाला. दाेन्ही वाहनं समोरा समोर धडकल्याने वाहनांचे माेठं नुकसान झाले आहे.

accident vehicle
Saam Impact: तू चाल पुढं रे गड्या! Maharashtra Kesari पृथ्वीराज पाटीलवर बक्षीसांची खैरात

या अपघातात चाैघे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना विटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांना अपघाताची माहिती मिळताच ते साताराचा दौरा सोडून विट्याकडे (vita) रवाना झाले.

Edited By : Siddharth Latkar

accident vehicle
Maharashtra Kesari: मैदानात गाळला घाम...पदरी नाही इनाम : पृथ्वीराज पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com