Buldhana: जलंब रेल्वे स्थानकावर आंदाेलकांनी राेखली महाराष्ट्र एक्सप्रेस

ग्रामस्थ आक्रमक झाल्याने पाेलिसांची कुमक वाढविण्यात आले.
villagers in rail roko andolan in buldhana
villagers in rail roko andolan in buldhanasaam tv
Published On

- संजय जाधव

बुलढाणा : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी (buldhana) जलंब रेल्वे स्थानकासमोर (jalbam railway station) ठिय्या आंदोलनास बसलेले आंदोलक आज आक्रमक झाले. त्यांनी गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (maharashtra express) जलंब रेल्वे स्थानकावर रोखून धरली आहे. यावेळी शेकडो महिला पुरुष रेल्वे (railway) रुळावर उतरले होते. सकाळपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र तरीही रेलरोको (rail) आंदोलन करण्यात आंदाेलक यशस्वी झाले. (maharashtra express latest marathi news)

कोरोना (corona) व लॉकडाउन (lockdown) काळात बुलढाणा जिल्ह्यातील जलंब जंक्शन रेल्वे स्थानकावर थांबा बंद केलेल्या प्रवासी गाड्याना थांबा पूर्ववत सुरू करावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून या परिसरातील नागरिकांनी जलंब रेल्वे स्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले होते. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज तीव्र आंदाेलन छेडण्यात आले आहे.

villagers in rail roko andolan in buldhana
Dhule: शंकर मार्केट परिसरात आग; महिन्यातील दुसरी घटना

आज सकाळी आंदाेलकांनी गोंदिया (gondia) कोल्हापूर (kolhapur) महाराष्ट्र एक्स्प्रेस जलंब रेल्वे स्थानकावर रोखून धरली. त्यानंतर पाेलिसांनी आंदाेलकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नका असे म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com