Satara: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला ५१ हजार बक्षीस देण्यास अडचण नव्हती, पण...

साता-यात शनिवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर बक्षीससाठी पृथ्वीराज पाटीलने खंत व्यक्त केली हाेती.
deepak pawar
deepak pawarsaam tv

सातारा : महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) पृथ्वीराज पाटील (prithviraj patil) यांस बक्षीसाची रक्कम आम्ही (संयाेजक म्हणून) द्यावी असं यजमानपद घेताना ठरलं नव्हते. आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस एकवीस लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. त्यातून प्रशिक्षकांचे मानधन, गुणफलक अन्य तांत्रिक यंत्रणेसाठी वापरले जातात. काेट्यावधी रुपये खर्च केले अन् एकावन्न हजार रुपये द्यायला काेणतीच अडचण नव्हती असे (satara) तालीम संघचे संघटक (sports) या स्पर्धेचे संयाेजक दीपक पवार (deepak pawar) यांनी स्पष्ट केले. (maharashtra kesari kusti latest marathi news)

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा (satara) जिल्हा तालीम संघ यांच्यावतीने ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी झाली. यामध्ये काेल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला तर मुंबईचा विशाल बनकर उपविजयी झाला. आज (रविवार) काेल्हापूरात पृथ्वीराजने आयाेजकांकडून राेख रक्कम मिळाली नाही अशी खंत व्यक्त केली आहे.

deepak pawar
Maharashtra Kesari: मैदानात गाळला घाम...पदरी नाही इनाम : पृथ्वीराज पाटील

पाटील याने खंत व्यक्त केल्यानंतर या स्पर्धेचे संयोजक दीपक पवार यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि संयाेजन समिती (सातारा) यांच्यात ठरलेल्या गाेष्टींचा उलगडा केला. दरम्यान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची आमच्याकडून (संयाेजन समिती सातारा) अपेक्षा असेल तर जरुर आम्ही त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊ असेही पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

deepak pawar
Saam Impact: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून 5 लाखांच बक्षीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com