जम्मू -काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ निष्पाप जणांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाचा भाग असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट या विभागाने हल्ला केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाई करायला सुरुवात केली.
पहलगाम हल्ल्यानंतर लगेच भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने तयारी सुरु केली. या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारताविषयी बरळला. त्याने पहलगाम हल्ल्याला भारतीय सैन्य जबाबदार आहे. तुम्ही नालायक, बिनकामाचे आहात असे म्हणत आफ्रिदीने भारतीय सैन्यावर टिका केली. आफ्रिदीच्या वक्तव्यावरुन अनेक भारतीय संतापले.
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने आफ्रिदीच्या विधावावर संताप व्यक्त केला. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत आफ्रिदीला खडेबोल सुनावले. कारगिलमध्ये सुद्धा तुम्हाला हरवलं होतं. आधीच तुम्ही खालची पातळी गाठली आहे, आता अजून किती माती खाणार.. उगाच कमेंट्स पास करण्याऐवजी स्वत:च्या देशाच्या प्रगतीसाठी मेंदू वापर. भारतीय सैन्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. भारत माता की जय, जय हिंद! असे धवनने पोस्टमध्ये लिहिले.
शिखर धवनची एक्स पोस्ट पुन्हा शेअर करत शाहिद आफ्रिदीने चहाच्या कपसोबत फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'हार-जीत सोड, चल मी तुला चहा पाजतो शिखर' असे आफ्रिदीने लिहिले. या पोस्टद्वारे आफ्रिदीने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा उल्लेख करत धवनला डिवचले असल्याचे काहीजण म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.