RR vs RCB Playing XI Prediction Rajasthan royals vs royal challengers bangalore playing 11 and match prediction amd2000 twitter
Sports

RR vs RCB, Playing XI: आज राजस्थान - बंगळुरु भिडणार! कोण मारणार बाजी?

Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore: आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

RR vs RCB Playing XI Prediction And Match Details:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रंगणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने या मैदानावरील सर्व सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ४ पैकी ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कोणता संघ बाजी मारणार? जाणून घ्या.

राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. या संघाने ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघावर २० धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर १२ धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ६ गडी राखून पराभूत केलं. (Cricket news in marathi)

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या ४ पैकी ३ सामने गमावले आहेत आणि एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ ३० वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचा पारडं जड राहिलं आहे. या संघाने १५ वेळेस बाजी मारली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १२ सामने जिंकता आले आहेत. तर ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT