आयपीएल २०२४ स्पर्धेतील १८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईचा दारुण पराभव झाला. हैदराबादने ६ विकेट राखत सीएसकेने दिलेले आव्हान पार केले. (Latest News)
चार सामन्यातून चेन्नईचा हा दुसरा पराभव आहे. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेल्या हैदराबादच्या संघाने चांगली सुरुवात केली. एसएचआरच्या फलंदाज सुरुवातीपासून आक्रमक राहत चेन्नईच्या खेळाडूंना दबावात ठेवलं. हैदराबादच्या संघाने १८.१ षटकात ४ विकेट गमावत चेन्नईचं आव्हान पार केलं. सनराइजर्स हैदराबादकडून फलंदाजी करताना एडन मार्करम याने ३६ चेंडूत ५० धावा केल्या. यंदाच्या सत्रातील पहिला सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीने हैदराबादला विजयी षटकाराने सामना जिंकून दिला. रेड्डीने दिपक चहरच्या १९ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जोरदार षटकार मारत चेन्नईचा पराभव केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेकने १२ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याने ३०८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. अभिषेकने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला दीपक चहरने जडेजाच्या हाती झेलबाद केले. महिष तिक्षीनाच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने रचिनकडे झेल दिला. हेड ३१ धावा करून बाद झाला. शाहबाज अहमद १८ धावा करून बाद झाला.
शिवम दुबेची ४५ धावांची खेळी
गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने सीएसकेचा डाव ५ गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावांवर रोखला. यात चेन्नईच्या शिवम दुबेनेच चांगली फलंदाजी करत हैदराबाच्या गोलंदाजांकडून मिळवल्या. दुबेने २४ चेंडूमध्ये ४५ धावा केल्या ४ चौकार आणि ४ षटकार मारत संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली. हैदरबादच्या गोलंदाजांनी कमी गतीचे चेंडू टाकून चेन्नई एक्स्प्रेसच्या धावांना ब्रेक लावला.
सीएसकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करताच आली नाही. हैदराबादच्या कर्णधाराने वापरलेल्या रणनितीपुढे चेन्नईचा सर्व डाव फसला. दुबेनंतर अजिंक्य रहाणेने ३० चेंडूमध्ये ३५धावा केल्या, तर रविंद्र जडेजाने २३ चेंडूमध्ये नाबाद राहत ३१ धावा केल्या. कर्णधार ऋतुराजने २१ चेंडूमध्ये २६ धावा केल्या.
दुबेच्या विकेटमुळे चेन्नई एक्सप्रेस झाली फेल
जर दुबे अजून काही काळासाठी राहिला असता तर चेन्नई या सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकली असती. शिवम दुबेने मैदानावर येताच आपला आक्रमकपणा दाखवला. त्याने शाहबाजला एक चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर नवव्या षटकात परत अशीच फटकेबाजी केली. नववे षटक टाकायला आलेल्या मयंक मार्कंडेयला दुबेने चांगलाचा धुतला.
एकंदरीत चेन्नईचे इतर फलंदाज धावांसाठी तळमळत होते, एकटा दुबेच हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. त्याने २५ चेंडूमध्ये ४५ धावा केल्या. दुबे १२ व्या षटकात एक षटकार मारल्यानंतर झेलबाद झाला. दुबेच्या विकेटने चेन्नई संघाच्या धावांना ब्रेक लागला. शिवम दुबेनंतर कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.