rohit sharma saam tv news
क्रीडा

Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Rohit Sharma News In Marathi: या मैदानात सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record In T20I:

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

यासह टी -२० मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर टी -२० संघात कमबॅक करत असलेल्या रोहित शर्माला या सामन्यातही खातं उघडता आलेलं नाही. दरम्यान मैदानात उतरताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने २००७ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याच वर्षी भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं रोहितने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३९.१५ च्या स्ट्राईक रेटने ३८५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावली आहेत. यासह २९ अर्धशतकं झळकावली आहेत. (Latest sports updates)

असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज..

रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासाला गवसणी घातली आहे. तो १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १२८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर १२४ सामने खेळणारा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज मार्टिन गप्टीलच्या नावे १२२ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची नोंद आहे. या दिग्गज खेळाडूंसह बांगलादेशचा महमदुल्लाह रियाज, न्यूझीलंडचा टीम साउदी आणि भारतीय संघाचा विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीने भारतीय संघाकडून ११६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT