दिल्ली, ता. १४ जुलै २०२४
आयपीएल 2024 मधील खराब कामगिरीनंतर दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यावर टीका होत आहे. त्यानंतर शनिवारी पॉँटिंगला पदावरून हटवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन रिकी पाँटिंगला हटवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने ट्विट करून ही माहिती दिली. 7 सीझननंतर दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला हटवण्याचा होण्याचा निर्णय घेतला आहे. हा खूप चांगला प्रवास होता, प्रशिक्षक! प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज माजी कर्णधार गेल्या सात वर्षांपासून दिल्लीच्या संघाचा भाग होता. फ्रँचायझीसोबत दीर्घकाळ असूनही पाँटिंग संघाला जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. आयपीएलच्या १७ व्या सीझनमध्येही दिल्ली कॅपिटल्सने पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहून प्ले-ऑफमधील स्थान गमावले होते.
रिकी पाँटिंगला पदावरून हटवल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सौरव गांगुलीला ही जबाबदारी दिली जाऊ शकते असा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. पाँटिंगच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्समध्ये सल्लागाराची भूमिका बजावणारा माजी भारतीय कर्णधार गांगुली संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत फ्रँचायझीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सौरव गांगुलीचे महत्वाचे विधान!
याबाबत सौरव गांगुलीनेही एक महत्वाचे विधान केले आहे. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, मला आयपीएल 2025 साठी प्लॅन करायचा आहे. मला एकदा दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल जिंकायचे आहे. मेगा लिलाव पुढील वर्षी आहे आणि त्यामुळे मी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणार नाही. मला फ्रँचायझींशी बोलावे लागेल मी मुख्य प्रशिक्षक असेन. .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.