Gautam Gambhir : ठरलं ! गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक; जय शाहांची घोषणा

Gautam Gambhir Team India Head Coach: नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने विजेते पदक जिंकलं होतं. गौतम गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता. कोलकाताने १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले होते.
Gautam Gambhir : ठरलं ! गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक; जय शाहांची घोषणा
Gautam Gambhir Team India Head Coach

टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळालाय. बीसीसीआयने माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीरकडे टीम इंडियाची जबाबदारी सोपवलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी 9 जुलै रोजी गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक असणार असल्याची घोषणा केलीय.

गेल्या महिन्यापर्यंत, गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक होता, जिथे त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकले होते. बीसीसीआयचे सचिव जय शाहने त्याच्या अधिकृत X अकाउंटवर याची माहिती दिलीय. गंभीरची टीम इंडियाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जय शहा यांनी दिली. इतकेच नाही तर त्यांनी गौतम गंभीरवर विश्वास व्यक्त केलाय. गंभीरवर पूर्ण विश्वास आहे. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी तो एक आदर्श व्यक्ती असेल, असं जय शहा म्हणालेत.

दरम्यान राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. या पदासाठी गौतम गंभीरच्या नावाचा चर्चा जोरात होती. आज शेवटी अधिकृतपणे त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारताने २०२३ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ५० षटकांच्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. त्यानंतर टी२० विश्वचषक २०२४ चा विश्वकप जिंकला.

या विश्वकपच्या अंतिम सामन्याच्या समाप्तीनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला. दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही द्रविडचे यशस्वी कार्यकाळाबद्दल अभिनंदन केले. तर क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी गंभीरवर विश्वास व्यक्त केलाय.

दरम्यान नियुक्तीबद्दल बोलतांना गंभीरने X वर लिहिलं की"भारत ही माझी ओळख आहे आणि माझ्या देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. वेगळी टोपी परिधान करूनही परत येणं हा मला सन्मान वाटतो. पण माझे ध्येय तेच आहे. १.४ अब्ज भारतीयांच्या स्वप्नांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा आणि मी ही स्वप्ने साकार करण्यासाठी माझ्या शक्तीने सर्व काही करेन!

Gautam Gambhir : ठरलं ! गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक; जय शाहांची घोषणा
IND W vs SA: स्मृतीचा विजयी षटकार; १० विकेट राखत टीम इंडियाचा विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com