Ricky Ponting Statement: दिल्लीच्या दारुण पराभवानंतर हेड कोच रिकी पाँटिंग भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Ricky Ponting Statement After DC vs KKR Match: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच रिकी पाँटिंग भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.
Delhi capitals head coach ricky ponting gets angry on teams poor performance against kolkata knight riders amd2000
Delhi capitals head coach ricky ponting gets angry on teams poor performance against kolkata knight riders amd2000twitter

Ricky Ponting Statement On Delhi Capitals Defeat:

आयपीएल २०२४ स्पर्धेत बुधवारी (३ एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १०६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दारुण पराभवानंतर संघाचा हेड कोच रिकी पाँटिंग नाराज असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान त्याने संघालाही खडसावलं आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २७२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण डाव १६६ धावांवर संपूष्टात आला. या सुमार कामगिरीनंतर बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, 'मी संघाच्या कामगिरीने दुखावलो गेलो आहे. गोलंदाज इतक्या धावा कशा खर्च करु शकतात, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. आम्ही या सामन्यादरम्यान १७ वाईड चेंडू टाकले आणि षटक पूर्ण करण्यासाठी २ तासांचा वेळ घेतला. परिणामी आम्ही २ षटकं मागे राहिलो. त्यामुळे शेवटच्या २ षटकात ५ ऐवजी केवळ ४ क्षेत्ररक्षक ठेवावे लागले.' (Cricket news in marathi)

Delhi capitals head coach ricky ponting gets angry on teams poor performance against kolkata knight riders amd2000
IPL 2024 Point Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, KKRची पहिल्या स्थानावर झेप

तसेच तो पुढे म्हणाला की, ' या सामन्यात असं खूप काही घडलं जे अस्वीकार्य आहे. आम्ही लवकरच यावर चर्चा करु आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. काही गोष्टी मोकळ्याने बोलण्याची गरज आहे. आम्हाला गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सर्वच गोष्टींवर चर्चा करावी लागणार आहे.'

Delhi capitals head coach ricky ponting gets angry on teams poor performance against kolkata knight riders amd2000
DC vs KKR,IPL 2024: विजयाच्या हॅट्ट्रिकचं क्रेडिट श्रेयसने कोणाला दिलं?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयय अय्यरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेनने ८५ आणि अंगक्रिश रघुवंशीने ५४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकअखेर ७ गडी बाद २७२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव १६६ धावांवर आटोपला. यासह दिल्ली कॅपिटल्सला हा सामना १०६ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com