DC vs KKR,IPL 2024: विजयाच्या हॅट्ट्रिकचं क्रेडिट श्रेयसने कोणाला दिलं?

Shreyas Iyer Statement: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर श्रेयस अय्यरने मोठा खुलासा केला आहे.
shreyas iyer
dc vs kkr ipl 2024 shreyas iyer statement after win over delhi capitals cricket news in marathi twitter
Published On

DC vs KKR, IPL 2024, Shreyas Iyer Statement:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १६ वा सामना विशाखपट्टणमच्या VDCA क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. आपल्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने या सामन्यात १०६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २७२ धावांचा डोंगर उभारला होता. दरम्यान या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपला गेम प्लान सांगितला आहे.

काय होता श्रेयस अय्यरचा गेम प्लान?

या सामन्यात युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी दिल्लीच्या गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला. यासह सलामीला आलेल्या सुनील नरेनने देखील दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

आपल्या गेम प्लानबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ' खरं सांगायचं तर, आम्ही २१०-२२० धावांचं आव्हान ठेवलं होतं. २७० धावा या आमच्यासाठी बोनस ठरल्या. सामन्यापूर्वी झालेल्या मुलाखतीत मी म्हटलं होतं की, सनीचं काम असेल संघाला चांगली सुरुवात करून देणं.' तसेच रघुवंशीबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' तो पहिल्या चेंडूपासूनच निडर होऊन फलंदाजी करत होता. त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. तो जे शॉट्स खेळत होता ते खरचं पाहण्यासारखे होते.' (Cricket news in marathi)

shreyas iyer
IPL 2024: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट; कधी दिसणार मैदानात?

हर्षित राणाबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' तो मैदानावर आपला खांदा धरून बसला होता. त्याला काय झालंय हे मलाही माहीत नाही. हे माझ्यासोबतही झालं आहे.'

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर २७२ धावा केल्या. यादरम्यान सुनील नरेनने ३९ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. तर रघुवंशीने २७ चेंडूत ५४ धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाजांना हवी तशी सुरुवात करता आली नाही. हा सामना दिल्लीने १०६ धावांनी गमावला.

shreyas iyer
IPL 2024 Point Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, KKRची पहिल्या स्थानावर झेप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com