प्रो कबड्डी लीग स्पर्धेत युं मुंबा आणि तेलुगु टायटन्स या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे.अखेरच्या क्षणापर्यंत गेलेल्या या सामन्यात तेलुगु टायटन्स संघाने यु मुंबा संघाला 45-45 असे बरोबरीत रोखून सनसनाटी निकालाची नोंद केली.
ताऊ देवीलाल इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत तेलुगू टायटन्सकडून पवन सेहरावतने आक्रमणात 14 गुण, तर, यु मुंबाकडून आमीर मोहम्मद जाफर दानिशने 11 गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली.
संथ सुरुवातीनंतर तेलुगु टायटन्स (Telugu Titans) संघाला पहिली पकड करण्यासाठी सहा मिनिटे लागली. पाठोपाठ पवनने अप्रतिम चढाई केल्यामुळे यु मुंबाचे केवळ दोन खेळाडू मैदानात राहिले होते. मात्र सोमबिर व गुमान सिंग यांनी सुपर टॅकल करता यु मुंबा संघाला दहाव्या मिनिटाला 11-7 ने आघाडीवर नेलं.
मात्र पवनने एकच चढाईत तीन खेळाडू बाद केल्यामुळे टायटन्स संघाने यु मुंबा (U Mumba) संघावर पहिला लोन चढवत 13-12 अशी आघाडी घेतली. मध्यंतराला गुण फलक 19-19 असा बरोबरीत राहिला. (Kabaddi News In Marathi)
मध्यंतरानंतर जाफर दानिशने दोन गुणांची कमाई केली. तर, बिट्टूने संजिवीची पकड केल्यामुळे यु मुंबाने टायटन्स पहिला लोन चढवून 25-20 अशी आघाडी घेतली.
शंकर गडई आणि पवन सेहरावत यांच्या यशस्वी चढाईमुळे टायटन्स संघाने 31व्या मिनिटाला यु मुंबा संघावर दुसरा लोन चढवून आपली पिछाडी 31-30 अशी कमी केली.
पवनने शिवांशला बाद करून प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चढाईत 200गुण मिळवणारा तिसरा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तेलुगु टायटन्स विजयाकडे आगेकूच करत असतानाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या हैदर एकरामीने तीन गडी बाद केल्यामुळे यु मुंबा संघाने टायटन्स वर लोन चढवीत 44-35 अशी आघाडी घेतली तेव्हा केवळ तीन मिनिटे बाकी होती.
मात्र अखेरच्या मिनिटाला पवनने एका चढाईत चार गडी बाद करून सामन्याचे पारडे फिरविले. अखेरच्या चढाईत मुंबईवर लोन चढवताना टायटन्स संघाने 45-45 अशी बरोबरी साधली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.