PKL Season 10: पुणेरी पलटण संघाचा बेंगळुरू बुल्स संघावर मोठा विजय

Pro Kabaddi News In Marathi: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणेरी पलटणने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
aslam inamdar
aslam inamdar saam tv news
Published On

Pro Kabaddi News In Marathi:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पुणेरी पलटणने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता बेंगळुरू बुल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने 40-31 असा पराभव केला आहे.

त्यागराज इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत पुणेरी पलटण संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारताना निर्णायक आघाडी घेऊन वर्चस्व कायम राखले. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बेंगळुरू बुल्सच्या सुशिलच्या डू ओर डाय चढाईतील अपयशामुळे धक्का बसला. त्याउलट कर्णधार अस्लम इनामदारच्या भेदक चढायामुळे आणि मोहित गोयतने त्याला दिलेल्या साथीमुळे पुणेरी पलटण संघाला आपली पकड कायम राखता आली.

पूर्वार्ध संपत असताना बेंगळूरु बुल्स संघाने पिछाडी कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सुशीलने निर्णायक चढाईत गुण मिळवले तर, परतिकने अस्लम इनामदारची पकड केली.. मात्र त्याचवेळी मोहित गोयत बचाव पटू च्या भूमिकेतून महत्वाची कामगिरी करताना थेट सुशीलचीच पकड करून मध्यंतराला पुणेरी पलटण संघाला 18-13 अशी आघाडी मिळवून दिली. (Kabaddi News in marathi)

aslam inamdar
IND vs ENG Test Series: शेवटच्या ३ सामन्यांसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा! हे २ स्टार खेळाडू करू शकतात कमबॅक

उत्तरार्धात आकाश शिंदेने सुपर टॅकल मधून सुटका करून घेताना बेंगळूरु च्या आशा कायम राखल्या, मात्र डू ऑर डाय चढाईत सुशील पुन्हा अपयशी ठरल्याने बेंगळूरु संघ पुन्हा पिछाडीवर पडला. उत्तरार्धातील 14व्या मिनिटाला अस्लम इनामदारच्या चढाया आणि मोहित गोयत व आकाश शिंदेच्या पकडी यामुळे बेंगळूरु संघावर लोन चाढवताना उत्तरार्धातील पहिल्या स्ट्रेटेजिक टाइम आऊट च्या वेळी पुणेरी पलटण संघाला 33-18 असे वर्चस्व आघाडी मिळवून दिले.

aslam inamdar
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

बेंगळुरू ने अखेरच्या सत्रात भारतला मैदानात उतरविले मात्र पुणेरी पलटण संघाची मोठी आघाडी त्यांना तोडून काढता आली नाही या परभवमुळे बेंगळूरु बुल्स संघाच्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याच्या आशाना धक्का बसला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com